भाजपाच्या वतीने भारतीय सैन्याचा विजय दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:50 AM2018-12-18T00:50:20+5:302018-12-18T00:50:57+5:30

हुतात्मा स्मारक येथे भाजपा माजी सैनिक आघाडी, महिला आघाडी यांच्या वतीने भारतीय सैन्याचा विजय दिवस साजरा करण्यात आला.

 Celebrate the victory of the Indian army on behalf of the BJP | भाजपाच्या वतीने भारतीय सैन्याचा विजय दिवस साजरा

भाजपाच्या वतीने भारतीय सैन्याचा विजय दिवस साजरा

Next

नाशिक : हुतात्मा स्मारक येथे भाजपा माजी सैनिक आघाडी, महिला आघाडी यांच्या वतीने भारतीय सैन्याचा विजय दिवस साजरा करण्यात आला.  १९७१ साली भारत पाकिस्तानचे युद्ध झाले, त्यात भारतीय बहादूर सैनिकांनी पाकिस्तानचे ९० हजारांपेक्षा अधिक सैनिकांना समर्पण होण्यासाठी भाग पाडले तसेच कैदी बनविले. भारताचा सगळ्यात मोठा विजय झाला व त्यातून बांगलादेशची निर्मिती करण्यात आली. नाशिक येथे भारताचा विजय दिवस साजरा करण्यात आला. या युद्धामध्ये आपल्या देशाचे अनेक सैनिक शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी या युद्धात सामील असलेले बहादूर जवान विजय पवार यांनी आठवणी सांगितल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा माजी सैनिक महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष निर्मला पवार, अलका मान, या युद्धात सामील असलेले बहादूर जवान विजय पवार, आनंद कापसे, माजी सैनिक हवालदार भास्कर पवार, दिनकर पवार, औसरकर, सुरेश देवरे, सोपान मुसळे, कुलकर्णी व अनेक माजी सैनिक आणि माजी सैनिक महिलासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  Celebrate the victory of the Indian army on behalf of the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.