शेतकºयांना रोखीने पैसे : वीस कोटी रुपयांची उलाढाल; सलग तीन दिवस राहणार लिलाव बंद लासलगाव, विंचूरला कांद्याची विक्रमी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:45 AM2017-12-16T00:45:58+5:302017-12-16T00:46:45+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात शुक्रवारी २२१७ वाहनांमधून सर्वाधिक ३४,८६६ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली.

Cash Withdrawal to Farmers: Turnover of Rs. 20 Crore; Lakhgaon closed for auction for three consecutive days, record arrival of onions to Vinchur | शेतकºयांना रोखीने पैसे : वीस कोटी रुपयांची उलाढाल; सलग तीन दिवस राहणार लिलाव बंद लासलगाव, विंचूरला कांद्याची विक्रमी आवक

शेतकºयांना रोखीने पैसे : वीस कोटी रुपयांची उलाढाल; सलग तीन दिवस राहणार लिलाव बंद लासलगाव, विंचूरला कांद्याची विक्रमी आवक

Next
ठळक मुद्देबाजारभाव कमीत कमी ९०० रुपये दिवसभरात सुमारे दोन कोटींची उलाढाल शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात शुक्रवारी २२१७ वाहनांमधून सर्वाधिक ३४,८६६ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. बाजारभाव कमीत कमी ९०० रुपये तर जास्तीत जास्त ३,४२० रुपये व सर्वसाधारण २८५१ रुपये प्रतिक्विंटल होते. सर्व कांद्याचे सायंकाळपर्यंत लिलाव झाले. दिवसभरात सुमारे दोन कोटींची उलाढाल झाली.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी येथील बाजार समितीच्या स्वतंत्र कांदा बाजार आवारात दिवसभरात १३७७ ट्रॅक्टर व ८४० पिकअपमधून ३४,८६६ क्विंटल कांदा विक्रीस आला होता. शनिवार, रविवार साप्ताहिक सुटी व सोमवारी अमावास्येमुळे कांदा लिलाव बंद राहणार असल्याने येथील बाजार समितीत कांदा विक्री करण्यासाठी शेतकºयांनी एकच गर्दी केली होती. आलेल्या सर्व कांद्याचे लिलाव पूर्ण करण्याच्या दृष्टीने अडते, व्यापारी, मदतनीस, कामगार व समितीच्या सेवकांनी जलदगतीने लिलाव प्रक्रिया पूर्ण केल्याने आज विक्र मी कांदा आवकेचा लिलाव पूर्ण करण्यात आले. सध्या लाल कांद्याबरोबरच येथील बाजार समितीत मका, सोयाबीन या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. आलेल्या सर्व आवकेचे पैसे त्याच दिवशी लिलाव पूर्ण करून शेतकरी बांधवांना रोख अथवा धनादेशाद्वारे दिले जात आहेत. आज बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारमिळून सुमारे वीस कोटी रुपयांची उलाढाल झाली. यंदा कांद्यास चांगले बाजारभाव मिळत असल्याने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. बाजार आवारावर आलेल्या सर्व आवकेचे लिलाव वेळेत पूर्ण केल्याबद्दल बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती संदीप दरेकर, सचिव बी.वाय. होळकर यांच्यासह सदस्य मंडळाने सर्व अडते, व्यापारी, हमाल, मापारी, कांदा भरणार हमाल, मदतनीस व बाजार समिती सेवकांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.

Web Title: Cash Withdrawal to Farmers: Turnover of Rs. 20 Crore; Lakhgaon closed for auction for three consecutive days, record arrival of onions to Vinchur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा