तांगा शर्यत भरविणाऱ्या २९ जणांविरु द्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:01 PM2019-04-02T23:01:38+5:302019-04-02T23:03:00+5:30

साकोरा : तांगा शर्यतीवर बंदी असूनदेखील नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त रविवारी (दि. ३१) बेकायदेशीर बैल व घोड्यास एकत्र जुंपून शर्यतीचे आयोजन करणाऱ्या २० आयोजकांसह शर्यतीत सहभागी असणाºया मुक्या जनावरांच्या नऊ मालकांवर नांदगाव पोलिसांत प्राणी संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A case has been registered against 29 people who have finished the race | तांगा शर्यत भरविणाऱ्या २९ जणांविरु द्ध गुन्हा दाखल

तांगा शर्यत भरविणाऱ्या २९ जणांविरु द्ध गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देनऊ जणांवर प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

साकोरा : तांगा शर्यतीवर बंदी असूनदेखील नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त रविवारी (दि. ३१) बेकायदेशीर बैल व घोड्यास एकत्र जुंपून शर्यतीचे आयोजन करणाऱ्या २० आयोजकांसह शर्यतीत सहभागी असणाºया मुक्या जनावरांच्या नऊ मालकांवर नांदगाव पोलिसांत प्राणी संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापैकी काही जणांवर गतवर्षीदेखील गुन्हा दाखल केला गेला होता. साकोरा येथे दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील तीन दिवस ग्रामदैवत श्री बाळनाथ महाराज यात्रा भरवण्यात आली होती. दुसºया दिवशी रीतिरिवाजाप्रमाणे यात्रेचा एक भाग म्हणून तांगा शर्यतीचे शांततेत आयोजन करण्यात आल्याची खबर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली होती. तिची खात्री करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे, हवालदार पगारे, गांगुर्डे, देवकाते, शिंदे तसेच जगताप हे खासगी वाहनाने साकोरा येथील नवे पांझण रस्त्यावर तारी शिवारात बैल आणि घोड्यांची शर्यत सुरू असल्याचे निदर्शनास आले.
तसेच सायंकाळी उड्डाण पुलावर अनेक बैल आणि घोडा भरलेल्या पिकअप पकडण्यात आल्या. त्यांना याबाबत माहिती विचारली असता परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले. पोलीस हवालदार रवींद्र चौधरी यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.रात्री उशिरापर्यंत यात्रा पंच कमिटी सदस्य तसेच उपसरपंच संदीप बोरसे, शरद सोनवणे, बाजीराव सुलाने, गणेश बोरसे, ग्रामपंचायत सदस्य किरण बोरसे, संजय सुरसे, सतीश बोरसे तसेच बाळू बोरसे, विजय बोरसे, प्रवीण पवार, अण्णा सुरसे, भारत बोरसे, सचिन बोरसे, राजेंद्र बोरसे, देवदत्त सोनवणे, शिवाजी बच्छाव, दीपक बोरसे, विठोबा बोरसे, ऋ षिकेश बोरसे, तेजुल बोरसे या २० जणांविरु द्ध प्राणिमात्र संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच या शर्यतीत बैल व घोडा मालक किरण हाके (कोंढार), सुभाष बर्शिल (भालूर), गहिनीनाथ बेंडके (हिसवळ बुद्रुक), कैलास गोटे (कोंढार), श्रावण गांगुर्डे (भालूर), नवनाथ लाहिरे (भालूर), दत्तू मुळे (शिरसगाव), रामदास इंगळे (नांदूर ता. येवला) या नऊ जणांवर प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A case has been registered against 29 people who have finished the race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.