युवकाकडून गावठी कट्ट्यासह काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:10 AM2018-10-13T00:10:27+5:302018-10-13T00:46:20+5:30

गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने गुरुवारी (दि़ ११) सायंकाळच्या सुमारास सापळा रचून अटक केली़

Cartridge seized from the youth by cloth | युवकाकडून गावठी कट्ट्यासह काडतूस जप्त

युवकाकडून गावठी कट्ट्यासह काडतूस जप्त

Next

नाशिक : गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने गुरुवारी (दि़ ११) सायंकाळच्या सुमारास सापळा रचून अटक केली़ वैभव प्रकाश बागुल (२२, रा. लोणार गल्ली, रविवार पेठ, रविवार कारंजा, नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार जिवाजी महाले, संदीप भांड यांना संशयित वैभव बागुल याच्याकडे गावठी कट्टा व जिवंत काडतूस असून, तो परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली रविवार पेठेत सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून ३० हजार रुपयांचा गावठी कट्टा व ५०० रुपयांचे जिवंत काडतूस जप्त केले आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Cartridge seized from the youth by cloth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.