राज्यातील बसस्थानकांवर होणार ‘मिनी थिएटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 01:53 AM2018-10-22T01:53:49+5:302018-10-22T01:54:12+5:30

रंग उडालेली बसस्थानके, बसस्थानकांमध्ये पडलेले खड्डे, ठिकठिकाणी पडलेला कचरा आणि स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त वाहणारे पाणी अशीच बहुतांश बसस्थानके दृष्टीस पडतात. परंतु आता अशा बसस्थानकांचा कायापालट होणार असून, नव्या संकल्पनेतील बसपोर्ट हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्य करण्यात येणार आहे. बसस्थानकांमध्ये खासगीकरणातून मिनी थिएटर उभारण्याला महामंडळाने मंजुरी दिली आहे.

Bus stations in the state will have 'mini-theater' | राज्यातील बसस्थानकांवर होणार ‘मिनी थिएटर’

राज्यातील बसस्थानकांवर होणार ‘मिनी थिएटर’

Next
ठळक मुद्देकायापालट : खासगीकरणातून होणार बसस्थानकांचा विकास; निविदाही मागविल्या

नाशिक : रंग उडालेली बसस्थानके, बसस्थानकांमध्ये पडलेले खड्डे, ठिकठिकाणी पडलेला कचरा आणि स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त वाहणारे पाणी अशीच बहुतांश बसस्थानके दृष्टीस पडतात. परंतु आता अशा बसस्थानकांचा कायापालट होणार असून, नव्या संकल्पनेतील बसपोर्ट हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्य करण्यात येणार आहे. बसस्थानकांमध्ये खासगीकरणातून मिनी थिएटर उभारण्याला महामंडळाने मंजुरी दिली आहे.
राज्य परिवहन महामंडळाने आपल्या ताफ्यात नव्या बसेस दाखल करून प्रवाशांना एस.टी.कडे वळविल्यानंतर आता बसस्थानकांचे स्वरूप पालटण्यावर मोठा भर देण्यात आला आहे. राज्यातील बसस्थानकांचा खासगीकरणातून विकास करताना प्रवाशांना अधिक आरामदायक सुविधा देण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. त्यामध्ये फुडपार्क, करमणूक, चिल्ड्रेन स्टॉल, हस्तकला स्टॉल, प्रतीक्षालय, प्रसाधनगृह आदी सुविधा आधुनिक बसस्थानकांमध्ये करण्यात येणार आहे.
खासगीकरणातून बसस्थानकांचा कायापालट करण्याचा पहिला प्रयोग नाशिकमधून सुरू झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमधील मेळा बसस्थानकात आधुनिक बसपोर्ट आणि मिनी थिएटर उपक्रमाचे उद्घाटन झाले आहे. आता राज्यातील काही महत्त्वाच्या स्थानकांवर अशा प्रकारचे मिनी थिएटर आणि फुडपार्क तयार करण्यात येणार आहे. यासाठीची निविदादेखील काढण्यात आली आहे.
ज्या बसस्थानकांमधून मुख्य शहरांसाठी गाड्यांची प्रवासी वाहतूक केली जाते आणि शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बसस्थानके आहेत अशाच बसस्थानकांवर मिनी थिएटर होणार असून, खासगीकरणातून उभे राहणारे थिएटर बीओटी तत्त्वावर चालविले जाणार आहे. परंतु नियंत्रण मात्र महामंडळाचेच असणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाने आपल्या ताफ्यात शिवशाही या आरामदायी गाड्या आणल्यानंतर महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. महामंडळ आणखी गाड्या विकत घेणार असून, खासगीतूनही अनेक गाड्या महामंडळ चालविण्यासाठी घेणार आहे.
मेळास्थानकातील काम संथगतीने
नाशिकमध्ये असलेल्या जुन्या मेळा बसस्थानकाचा विकास करून या जागेवर अत्याधुनिक बसपोर्ट तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. सुरुवातील महापालिकेने लादलेल्या करामुळे कामकाजास विलंब झाला होता. यातून तोडगा निघाल्यानंतरही कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. नाशिक शहरातील हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, मेळास्थानकाबरोबरच लवकरच महामार्ग बसस्थानकाचेदेखील सुशोभिकरण करून अद्ययावत स्थानक करण्यात येणार आहे.

Web Title: Bus stations in the state will have 'mini-theater'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.