भारत बंदच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील बससेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 01:21 PM2018-09-10T13:21:53+5:302018-09-10T13:24:00+5:30

प्रवाशांचे हाल

Bus service jam in Nashik on the back of the India bandh | भारत बंदच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील बससेवा ठप्प

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील बससेवा ठप्प

Next
ठळक मुद्देप्रवाशांचे हाल  रिक्षा, टॅक्सी, व्हॅनचा घ्यावा लागला आधार

नाशिक: देशभर रोज वाढत चाललेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कॉँग्रेसच्या वतीने संपुर्ण भारत बंदच्या पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.१०) सकाळपासून शहर बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून रिक्षा व खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. पहाट ५.३० पासून ७ वाजेपर्यंत नाशिकमधुन बाहेरगावच्या काही मोजक्या बस धावल्या. पण सकाळी ८ नंतर पुण्या-मुंबईत आंदोलकांनी सुरु केलेल्या दगडफेकीनंतर व पुण्यात पीएमपीची बस जाळण्याची घटना घडल्यानंतर बसचे नुकसान होऊ नये यासाठी नाशिक आगारातील सर्व बसेस बंद करण्यात आल्या. सकाळपासून एकही शहर बस धावली नाही. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार व नागरिक यांना खाजगी वाहनांचा सहारा घेत इच्छित स्थळ गाठावे लागत आहे. बाकी शहरातील व्यवहार सुरळीत सुरु आहेत.

Web Title: Bus service jam in Nashik on the back of the India bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.