ऐन दिवाळीमध्ये ‘एस.टी’ला ब्रेक : सलग दुसर्‍या दिवशी प्रवाशांचे हाल सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 04:39 PM2017-10-18T16:39:03+5:302017-10-18T17:14:00+5:30

प्रादेशिक परिवहन विभाग व महामंडळाने खासगी वाहतूकदारांची मदत घेत त्यांना परमिटची अट शिथिल करुन प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी राज्यात कोणत्याही शहरासाठी दिली आहे. यामुळे नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल कमी होताना दिसत असून सर्वच बसस्थानकांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.

A 'break' in Diwali: The passenger's stay on the second day in a row | ऐन दिवाळीमध्ये ‘एस.टी’ला ब्रेक : सलग दुसर्‍या दिवशी प्रवाशांचे हाल सुरूच

ऐन दिवाळीमध्ये ‘एस.टी’ला ब्रेक : सलग दुसर्‍या दिवशी प्रवाशांचे हाल सुरूच

Next
ठळक मुद्देखासगी वाहतूकदारदेखील एसटीच्या दरामध्ये प्रवाशी वाहतूक करण्यासाठी पुढे आले आहेपरमिटची अट शिथिल करुन प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी राज्यात कोणत्याही शहरासाठी दिली सर्वच बसस्थानकांमध्ये शुकशुकाट

नाशिक : सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा मोठा प्रभाव महामंडळाच्या नाशिक विभागावर पडला. मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेला चालक-वाहकांचा संप आज दुसर्‍या दिवशीही सुरूच असून अधिक तीव्र झाला आहे. यामुळे ‘एस.टी’ ला ब्रेक कायम आहे. संपासोबत नागरिकांचेही हाल सुरू आहे. प्रादेशिक परिवहन विभाग व महामंडळाने खासगी वाहतूकदारांची मदत घेत त्यांना परमिटची अट शिथिल करुन प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी राज्यात कोणत्याही शहरासाठी दिली आहे. यामुळे नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल कमी होताना दिसत असून सर्वच बसस्थानकांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.

खासगी वाहतूकदारदेखील एसटीच्या दरामध्ये प्रवाशी वाहतूक करण्यासाठी पुढे आले आहे. यामुळे नागरिकांना नाशिक येथून अन्य शहरांमध्ये जाण्यासाठी पर्यायी वाहतूकीचे साधन सवलतीच्या दरात उपलब्ध झाले आहे. एकूणच खासगी वाहतूकीचा पर्याय जरी नागरिकांपुढे असला तरी गैरसोय काही प्रमाणात होतच आहे. शहरांंतर्गत होणासर्वच बसस्थानकांमध्ये शुकशुकाट वाहतूकीवरही संपाचा प्रभाव दिसून येत आहे. लांब पल्ल्याची बससेवा प्रभावीत झाली असली तरी खासगी वाहतूकदारांचा पर्याय प्रवाशांपुढे आहे; मात्र शहरांतर्गत वाहतुकीची सर्व जबाबदारी रिक्षा चालकांवर येऊन ठेपली आहे. ऐन सणासुदीच्या काळात शहर बससेवाही दुसर्‍या दिवशी ठप्प राहिल्याने संताप व्यक्त होत आहे. महामंडळाच्या गलथान कारभाराविषयी नाशिककरांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. महामंडळाच्या अधिकार्‍याना शहर बस वाहतूकीचा संपही अद्याप मिटविता आला नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होत आहे.


मंगळवारी संपाच्या पहिल्या दिवशी महामंडळाला सुमारे एक कोटीचा आर्थिक फटका धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर बसला. दिवसभरात केवल ४३६ फेºया झाल्या होत्या. शहर बस वाहतुकीच्या सुमारे तीन हजार फेर्‍या  तर जिल्ह्यासह लांब पल्ल्याच्या सुमारे पाच हजार ८४७ फेर्‍या नियोजित होत्या; मात्र लांब पल्ल्याच्या मार्गावर केवळ ४३६ बसेस धावल्या तर शहर बस वाहतुकीच्या सकाळ सत्रात २५ बसेस धावू शकल्या. दुसर्‍या दिवशी मात्र बससेवा संपुर्णपणे ठप्प राहिल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title: A 'break' in Diwali: The passenger's stay on the second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.