नव्या ट्रॅक्टरखाली सापडून एकुलता एक मुलगा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 05:40 PM2019-06-22T17:40:12+5:302019-06-22T17:40:26+5:30

आनंद ठरला क्षणभंगुर : पेढे वाटता वाटता घडली दुर्देवी घटना

A boy was killed by a new tractor and the only one killed | नव्या ट्रॅक्टरखाली सापडून एकुलता एक मुलगा ठार

नव्या ट्रॅक्टरखाली सापडून एकुलता एक मुलगा ठार

googlenewsNext
ठळक मुद्देया घटनेने खरोले कुटुंबियांच्या आनंदावर क्षणार्धात विरजन पडून होत्याचे नव्हते झाले

सटाणा : नवीन घेतलेल्या ट्रॅक्टरवरून कुटुंबियांसह मोठ्या उत्साहाने शेतात जात असतांना गतीरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर उधळून ट्रॅक्टरवर बसलेला आठ वर्षांचा एकुलता एक मुलगा चाकाखाली सापडून करु ण अंत झाल्याची ह्रदयद्रावक घटना तालुक्यातील लखमापूर येथे घडली.
महालपाटणे (ता.देवळा) येथील रहिवाशी व व्हीपीएन संस्थेचे कर्मचारी विश्वनाथ खरोले यांनी सटाणा येथून शुक्रवारी (दि.२१) ट्रॅक्टर विकत घेतला. ट्रॅक्टर घेतल्याचा आनंद म्हणून खरोले हे आपल्या पत्नी व दोन्ही मुलांना ट्रॅक्टरवर बसवून आपल्या मूळ गावी महालपाटणे येथे जात असतांनाच लखमापूर येथे खरोले यांनी पेढे घेण्यासाठी आपल्या पत्नीला एका हॉटेलवर पाठवले. रहदारीला अडथळा नको म्हणून ट्रॅक्टर निंबोळा रस्त्याकडे उभे करण्यासाठी घेवून जात असतांनाच लखमापूर-निंबोळा चौफुलीवरील गतिरोधकावर ट्रॅक्टर उधळल्याने खरोले यांचा मुलगा आयुष तोल गेल्याने तो ट्रॅक्टरवरून खाली पडला. काही समजण्याच्या आत आयुषवर ट्रॅक्टरचे मोठे चाक चालून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खरोले कुटुंबियांच्या आनंदावर क्षणार्धात विरजन पडून होत्याचे नव्हते झाले. मोठ्या उत्साहाने नवीन ट्रॅक्टरचे पेढे घेवून आलेल्या आयुषच्या आईला आपल्या मुलाचा मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ आल्याचे पाहून आणि आपला एकुलता एक मुलगा आपल्याच ट्रॅक्टरखाली पडून मृत्यू झाल्याने आई - वडील आणि आयुषच्या बहिणीने हंबरडा फोडला. ही दुदैवी घटना तेथे उपस्थित सर्वांनाच चटका लावून गेली. आयुष हा सटाणा येथील मनीबाई अग्रवाल प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीत शिकत होता.

Web Title: A boy was killed by a new tractor and the only one killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.