गोविंदनगरमधील बेपत्ता विवाहितेचा मृतदेह आढळला राहत्या इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 03:52 PM2017-12-11T15:52:03+5:302017-12-11T15:59:20+5:30

मयत महिलेच्या नातेवाईकांकडे त्याबाबत पोलिसांनी विचारपूस केली; मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालामध्ये घातपाताबाबतची कु ठलाही पुरावा आढळून आला नाही.

 The bodies of missing unidentified marriages in Govind Nagar are found in the water tank on the roof of the building | गोविंदनगरमधील बेपत्ता विवाहितेचा मृतदेह आढळला राहत्या इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत

गोविंदनगरमधील बेपत्ता विवाहितेचा मृतदेह आढळला राहत्या इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत

Next
ठळक मुद्दे अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलेसिडको उपकेंद्राचा बंब घटनास्थळी तत्काळ पोहचलामहिलेने आत्महत्त्या केली असावी असा अंदाज पोलीस निरिक्षक नंदवाळकर यांनी वर्तविला

नाशिक : मागील दोन दिवसांपासून राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या ४३ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह राहत्या इमारतीच्या टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली. प्रारंभी पोलिसांना काही घातपाताचा संशय होता; मात्र शवविच्छेदन अहवालातून तसे काही पुरावे पुढे आले नसल्याची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गोविंदनगर परिसरातील कृषी बॅँक सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणा-या उषा नाना पाटील या दोन दिवसांपासून राहत्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्याबाबतची माहिती नातेवाईकांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, रविवारी सकाळी दहा वाजता पाटील यांचा मृतदेह सोसायटीच्या वरील पाण्याच्या टाकीमध्ये तरंगताना पोलिसांना आढळून आला. याबाबत तत्काळ पोलिसांनी अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सिडको उपकेंद्राचा बंब घटनास्थळी तत्काळ पोहचला. यावळी फायरमन बाळू लहामगे, संजय गाडेकर, सुनील निळे, शिवाजी मतवाड आदिंनी घटनास्थळी पोहचून पाण्याच्या टाकीत तरंगणारे मृतदेह तीन तास अथक प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला.
याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. प्रथमदर्शनी घातपाताचा संशय पोलिसांना बळावला होता. त्यामुळे मयत महिलेच्या नातेवाईकांकडे त्याबाबत पोलिसांनी विचारपूस केली; मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालामध्ये घातपाताबाबतची कु ठलाही पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे  सदर महिलेने आत्महत्त्या केली असावी असा अंदाज पोलीस निरिक्षक नंदवाळकर यांनी वर्तविला आहे. याप्रकरणी मंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेच्या पश्चात पती, मुले असा परिवार असल्याचे समजते.

Web Title:  The bodies of missing unidentified marriages in Govind Nagar are found in the water tank on the roof of the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.