भाजपाची पक्षीय विकलांगता उघड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:11 AM2017-12-03T01:11:51+5:302017-12-03T01:13:59+5:30

साराश किरण अग्रवाल इगतपुरी व त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकांतील प्रचाराचा धुरळा आता बºयापैकी उडू लागलेला दिसत आहे. प्राथमिक अवस्थेत सर्वच पक्षांमध्ये झालेली पडझड चर्चेच्या केंद्रस्थानी होती, आता अर्थकारणाने जोर धरलेला दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही पालिकांत सत्ता मिळविण्याच्या इराद्याने झटून कामाला लागलेल्या भाजपाला दोन्ही ठिकाणचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मात्र उधार-उसनवारीने घ्यावे लागले आहेत. गल्ली ते दिल्ली, कितीही प्रभाव असल्याचे सांगो; पण नगराध्यक्षपदाचा उमेदवार या पक्षाला स्वत:चा देता येऊ नये हेच यातील वैशिष्ट्य.

BJP's factional disability revealed! | भाजपाची पक्षीय विकलांगता उघड !

भाजपाची पक्षीय विकलांगता उघड !

Next
ठळक मुद्देतिकिटे देताना सर्वच पक्षात गडबडीमताचे ‘मोल’ फुटल्याच्या चर्चा नगराध्यक्ष निवडणूक असल्यानेही रंगत शिवसेनेची सत्ता उलथवणे सोपे नाही

साराश
किरण अग्रवाल
भाजपाची पक्षीय विकलांगता उघड !
इगतपुरी व त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकांतील प्रचाराचा धुरळा आता बºयापैकी उडू लागलेला दिसत आहे. प्राथमिक अवस्थेत सर्वच पक्षांमध्ये झालेली पडझड चर्चेच्या केंद्रस्थानी होती, आता अर्थकारणाने जोर धरलेला दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही पालिकांत सत्ता मिळविण्याच्या इराद्याने झटून कामाला लागलेल्या भाजपाला दोन्ही ठिकाणचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मात्र उधार-उसनवारीने घ्यावे लागले आहेत. गल्ली ते दिल्ली, कितीही प्रभाव असल्याचे सांगो; पण नगराध्यक्षपदाचा उमेदवार या पक्षाला स्वत:चा देता येऊ नये हेच यातील वैशिष्ट्य.
राजकीय स्वारस्य कसे ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचले आहे, आणि त्यापोटी ‘काय पण’ करायची कशी तयारी असते, हे गेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पहावयास मिळाले होतेच, त्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही पक्षनिष्ठा वगैरे खुंटीवर टांगून जी भरमसाठ पक्षांतरे घडून आली, तिकिटे देताना सर्वच पक्षात गडबडी झाल्या व आता आदर्श आचारसंहितेचा कितीही टाहो फोडला जात असला तरी, उघडपणे जे मताचे ‘मोल’ फुटल्याच्या चर्चा घडून येत आहेत त्याने आश्चर्य मुळीच वाटू नये. त्याऐवजी आश्चर्यच वाटून घ्यायचे तर ते याचे वाटायला हवे की, इतरांपेक्षा वेगळ्या राजकीय परंपरेचा डांगोरा पिटणाºया भाजपाला जिल्ह्यातील दोन्ही पैकी एकाही ठिकाणी घरातल्या अगर स्वकीयाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देता आलेली नाही. उधार-उसनवारीच्या भरोशावरच हा पक्ष दोन्हीकडे विजयपताका फडकवावयास निघालेला दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणच्या नगरपालिका निवडणूक प्रचाराने आता बºयापैकी वेग घेतला आहे. बºयाच कालावधीनंतर यंदा पुन्हा थेट नगराध्यक्ष निवडणूक असल्यानेही प्रचारात रंगत आलेली दिसत आहे. अर्थात, या निवडणुका घोषित झाल्या झाल्या राजकीय फटाके फोडणीला प्रारंभ झाला होता. इगतपुरीसारख्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होत्याचे नव्हते करून बरेचजण अन्य पक्षात चालते झाले आहेत, तर त्र्यंबकेश्वरमध्येही सर्वच पक्षात येथेच्च पडझड घडून आली होती. त्यामुळे यंदा निवडणुका नेहमीपेक्षा अधिक रंगतदार होतील असे चित्र होतेच. तसेच होताना दिसून येत आहे. कारण दोन्हीही ठिकाणी कोणत्याही पक्षाने त्याच्या विरोधी पक्षाची चिंता बाळगावी अशी नव्हे तर स्वकीयांचीच चिंता बाळगावी अशी स्थिती आकारास आलेली दिसत आहे. त्यामुळे विरोधकांमुळे पडण्यापेक्षा स्वपक्षीयांची नाराजी भोवल्यामुळे पराभवाला सामोरे जाण्याची वेळ अनेकांवर येण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे कमीअधिक प्रमाणात सर्वच पक्षात हे होतच असते. परंतु यंदा त्यात भाजपाचीही भर पडून गेली आहे. इगतपुरीमध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेने आजवर नगरपालिकेत सत्ता राबविली व राजकारण केले ते पाहता तेथे भाजपाचे संघटनात्मक अस्तित्व तसेही फारसे नव्हतेच. त्यामुळे याठिकाणी त्यांनी उधार उसनवारीचे उमेदवार घेणे समजूनही घेता यावे. परंतु ज्या त्र्यंबकेश्वरमध्ये सत्ता कोणत्याही पक्षाची असो, प्रभाव मात्र नेहमी भाजपाचाच राहिल्याचे बोलले जात आले आहे, त्याठिकाणीसुद्धा भाजपाने राजकीय हाराकिरी केलेली दिसून आली. बरे, केवळ नगरसेवकपदाच्या उमेदवारीसाठीच अन्य पक्षातून आलेल्या उमेदवारांना तिकिटे दिलीत असे नव्हे तर नगराध्यक्षपदासाठीही या पक्षाने आयातांना संधी दिली. त्यामुळे स्वाभाविकच स्वकीयांमध्ये नाराजीचा मोठा आगडोंब उभा राहिलेला दिसत आहे. निवडणूक प्रचारात रंग भरताना दिसत आहेत त्याला या स्वकीयांच्या सुप्त नाराजीचे प्रवाह कारणीभूत आहेत.
इगतपुरीच्या १९ जागांसाठी ७९ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार दिले असून, त्यापाठोपाठ सर्वाधिक उमेदवार भाजपाने (१८) दिले आहेत, तर काँग्रेसने १४ जागांवर उमेदवार दिले आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वातील बहुजन विकास आघाडीही यंदा कंबर कसून रिंगणात उतरली असून, त्यांनी १२ उमेदवार उभे केले आहेत. यात प्रथमदर्शनी सामना भाजपा व शिवसेना यातच होणे अपेक्षित असले तरी या दोघांच्या भांडणात राष्ट्रवादीची मात्र पुरती सद्दी संपून गेली आहे. फिरोज पठाण यांनी त्यांच्या साºया सवंगड्यांसह राष्ट्रवादी सोडून कमळ हाती घेतल्याने व पठाण यांनी स्वत:ला नगराध्यक्षपदाची उमेदवारीही मिळवून घेतल्याने राष्ट्रवादीला बॅकफुटवर जावे लागले. एरव्ही या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात होणाºया विविध आंदोलनांमध्ये इगतपुरी तालुक्यातील शाखा व तेथील पदाधिकारी हिरिरीने पुढे असल्याचे दिसत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्षही मोठ्या उच्चरवाने राजकीय चर्चेत सहभाग घेताना दिसत. पण या पक्षावर अशी नामुष्की गुदरली की नगरपालिकेसाठी त्यांना साधा एक उमेदवार उभा करता आला नाही. त्या पक्षाची पाटी त्यामुळे पूर्णत: कोरी राहिली. तशी परिस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्र्यंबकेश्वरमध्ये झाली. गेल्यावेळी सर्वाधिक सहा जागा मनसेने मिळविल्या होत्या. अर्थात, तत्कालीन पक्षनेते वसंत गिते यांचा पुढाकार त्यामागे होता. यंदा मात्र मनसेला एकही उमेदवार त्र्यंबकेश्वरमध्ये देता आलेला नाही. एकूण १७ जागांसाठी त्र्यंबकमध्ये ६४ उमेदवार उभे असून, भाजपाने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. काँग्रेसने ११, शिवसेनेने ९ तर राष्ट्रवादीने ४ जागांवर उमेदवार दिले आहेत. जिल्ह्यात काँग्रेसपेक्षा आम्हीच प्रबळ असल्याच्या गप्पा राष्ट्रवादी काँग्रेसकडून हाणल्या जात असताना या दोन्ही नगरपालिकांमध्ये उमेदवारीच्याच पातळीवर ज्या पद्धतीने राष्ट्रवादीची दाणादाण उडाली व काँग्रेसने मात्र त्या तुलनेत भरारी घेतल्याचे दिसून आले ते पाहता काँग्रेस तितकीही नादार नसल्याचे स्पष्ट व्हावे. अर्थात, या दोन्हीही नगरपालिका क्षेत्राच्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसच्या आमदार सौ. निर्मला गावित करीत असल्यानेही ही स्थिती आकारास आली आहे हे खरेच; परंतु राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने पत्ते फेकून दिल्यागत दुर्लक्ष केलेले दिसून आले ते आश्चर्यकारकच म्हणावयास हवे. महत्त्वाचे म्हणजे, इगतपुरीमध्ये थेट नगराध्यक्ष निवडणुकीला सामोरे जाऊ शकेल असा प्रभाव अगर क्षमता असलेला उमेदवार भाजपाला खुद्द आपल्या पक्षात मिळू शकला नाही म्हणून त्यांनी तेथे राष्ट्रवादीच्या फिरोज पठाण यांना आपल्या पक्षात घेऊन तशी संधी देणे एकवेळ ठीक; पण त्र्यंबकेश्वरमध्ये तर स्वत:कडेच एकापेक्षा एक सरस उमेदवार होते. निवडणूक लढण्यासाठी अलीकडच्या काळात महत्त्वाच्या ठरणाºया ‘एम’ व्हिटामिनची क्षमता असणारेही त्यात होते. तरी त्यांना डावलले गेले. काँग्रेसचे शहराध्यक्ष राहिलेल्या पुरुषोत्तम लोहगावकर यांना भाजपाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. त्यामुळे जेथे पक्ष संघटन मजबूत आहे तेथेदेखील नगराध्यक्षपदाचा उमेदवार या पक्षाला स्वत:चा देता येणार नसेल आणि तरी आपापल्या दिग्विजयाच्या बाता करणार असेल तर त्यातील राजकीय फोलपणा कुणाच्याही नजरेसच भरावा. त्र्यंबकेश्वरमध्ये तेच होताना दिसत आहे. संपूर्ण पक्षीय यंत्रणा थंडीत गारठल्यासारखी झालेली दिसत आहे ती पक्षाच्या या अनाकलनीय निर्णयामुळेच. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेनेही काँग्रेस व भाजपा असे दोन्ही उंबरे ओलांडून आलेल्या धनंजय तुंगार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. भाजपातील ‘घात’ गृहीत धरूनच तुंगार यांनी शिवसेनेचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. त्यामुळे भाजपाला धडा शिकविण्याच्या ईर्षेने तेथे लोहगावकर व तुंगार यांच्यात लढत होताना दिसत आहे. यात काँग्रेसच्या सुनील अडसरे यांनीही रंग भरला आहे. कारण तेदेखील मनसे व भाजपा या दोन्ही पक्षातील अनुभव घेऊन अंतिमत: काँग्रेसकडे आलेले आहेत. या सर्व राजकीय गोळाबेरीजमध्ये अपक्ष अ‍ॅड.पराग दीक्षित यांनीही बºयापैकी फटाके लावले आहेत. कारण नगराध्यक्षपदाचा कोणत्याच पक्षाचा उमेदवार स्वकीय नसल्याने आपल्या अपक्ष उमेदवारीवर जोर देऊन ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. इगतपुरीमध्ये फिरोज पठाण यांना शिवसेनेचे संजय इंदूलकर व काँग्रेसचे बद्रिनाथ शर्मा यांच्याशी निकराचा सामना करण्याची वेळ आली आहे. बहुजन विकास आघाडीचे महेश शिरोळे व अन्यही काही उमेदवार रिंगणात आहेत. पण लढत भाजपा-शिवसेनेतच रंगण्याची चिन्हे आहेत. यातही आजवरच्या नगरपालिकेच्या कामकाजात इंदूलकर यांनी आपला प्रभाव टिकवून ठेवला आहे. गावाच्या विकासाच्या बाबतीत म्हणायचे तर फारशी समाधानकारक स्थिती म्हणता येऊ नये. परंतु पक्षीय प्रभाव व संघटनात्मक पातळीवर इंदूलकरांनी प्रभाव राखला आहे. पठाण यांनीही अलीकडच्या काळात बºयापैकी बेरजेचे राजकारण केले आहे. शिवाय राजकीय हवेचा प्रवाह लक्षात घेऊन पक्ष बदल करण्याची समयसुचकता त्यांनी दाखविली. भाजपालाही त्यांच्या सारखे तरुण नेतृत्व हवेच होते. त्यामुळे तेथे दोघांची सोय झाली असे म्हणता यावे. पण वर्षानुवर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवणे वाटते तितके सोपे खचितच नाही. काँग्रेसचे शर्मा व विकास आघाडीचे शिरोळे यांनीही

Web Title: BJP's factional disability revealed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.