जैविक खते, पिके ही काळाची गरज : देसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:36 AM2018-02-25T01:36:15+5:302018-02-25T01:36:15+5:30

उत्पादनवाढीसाठी जैविक खते आणि पिके ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन धुळे येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. श्रीधर देसले यांनी केले. कृषी विभाग आणि कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने नाशिक कृषी महोत्सवात ‘कांदा व भाजीपाला’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.

Biological fertilizers, crops need time: DESLE | जैविक खते, पिके ही काळाची गरज : देसले

जैविक खते, पिके ही काळाची गरज : देसले

Next

नाशिक : उत्पादनवाढीसाठी जैविक खते आणि पिके ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन धुळे येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. श्रीधर देसले यांनी केले. कृषी विभाग आणि कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने नाशिक कृषी महोत्सवात ‘कांदा व भाजीपाला’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.  यावेळी प्रकल्प संचालक अशोक कांबळे, दिलीप देवरे, गोकूळ वाघ, गणेश वाकळे, तुषार आमले, संजय पारडे आदी उपस्थित होते. डॉ. देसले म्हणाले, जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा अभ्यास करून खतांचा वापर करावा. त्यानंतरच उत्पादक क्षेत्राचा विचार करायला हवा. जमिनीनुसार योग्य पीक निवडल्यास उत्पादनात यश मिळते. सध्या सूक्ष्म अन्नपदार्थ, गंधक, पालाश कमी झाल्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. म्हणून माती परीक्षणानंतर खतांचा वापर करावा तसेच हवामानाच्या बदलानुसार करावयाच्या उपाययोजनांचादेखील विचार शेतकºयांनी करावा, अशी सूचना त्यांनी केली. कांद्याचे पीक हंगामानुसार बदलणारे असल्याने शेतकºयांनी विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. कांदा पिकाच्या आजूबाजूस मक्याची लागवड करावी. बुरशीमुळे बियाण्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गंधक, सूक्ष्म पदार्थ, पालाश यांची मात्रा योग्य प्रमाणात द्यावी, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते.

Web Title: Biological fertilizers, crops need time: DESLE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी