अवलियाची शिक्षण प्रसारासाठी भारत भ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:59 AM2019-01-25T00:59:15+5:302019-01-25T00:59:34+5:30

मालेगाव : उत्तर प्रदेशातील सालेमपूर, जि. फरकाबाद येथील रहिवाशी असलेल्या आदित्यकुमार नामक अवलियाची शिक्षण प्रसारासाठी भारतभर भ्रमंती सुरू असून त्याने गेल्या दोन दिवसांपासून मालेगाव तालुक्यात विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे.

Bhullar Delmanti for spreading education of Avalaya | अवलियाची शिक्षण प्रसारासाठी भारत भ्रमंती

अवलियाची शिक्षण प्रसारासाठी भारत भ्रमंती

Next

शफीक शेख ।
मालेगाव : उत्तर प्रदेशातील सालेमपूर, जि. फरकाबाद येथील रहिवाशी असलेल्या आदित्यकुमार नामक अवलियाची शिक्षण प्रसारासाठी भारतभर भ्रमंती सुरू असून त्याने गेल्या दोन दिवसांपासून मालेगाव तालुक्यात विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे.
आदित्यकुमार यांच्या वडीलांनी मजुरी करीत तर आईने भिक मागून उदरनिर्वाह करीत मुलाला बी. एस्सी पर्यंत शिकविले. अत्यंत कष्टात शिकलेल्या आदित्यकुमार यांनी कुणी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरीता जिवनभर अविवाहित राहून ज्ञानदान करण्याचा संकल्प केला. हिंदी, इंग्रजी आणि गणित हे विषय संपूर्ण भारतात ते शिकवित आहेत. आतापर्यंत त्यांनी एक लाख १७ हजार कि. मी. प्रवास सायकलने केला असून २० राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि ८ राज्यपालांनी त्यांचा सन्मान करुन ज्ञानदानाच्या कार्याचा गौरव केला आहे.
गेल्या २७ वर्षापासून आदित्यकुमार ज्ञानदानाचे काम करीत असून आतापर्यंत दोन लाख मुलांना त्यांनी शिकविले आहे. आपल्या कुटुंबियांप्रमाणे कुणी भिक मागू नये असा त्यांचा हेतू असून त्यांना संसद भवनाकडून हिरो आॅफ दि अ‍ॅवार्ड म्हणून गौरविले आहे. गुगलनेही त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांचा सन्मान केला आहे. आदित्यकुमार हे आॅल इंडिया सायकल गुरू म्हणून प्रसिद्ध असून श्रीमती लाँगश्री या त्यांच्या माता तर भूपनारायण हे त्यांच्या पित्याचे नाव आहे. रात्री फुटपाथवर किंवा मिळेल त्या जागेवर मुक्काम करुन मिळेल ते अन्नावर गुजराण करीत ज्ञानदान करीत आहेत. कानपूर येथील डी. ए. व्ही. कॉलेजमधून त्यांनी बी. एस्सी पदवी उत्तीर्ण केली आहे. पावसामुळे दौरा उशिराजूनमध्येच आदित्यकुमार महाराष्टÑात येणार होते; परंतु पावसाचे दिवस असल्याने ते जानेवारीत महाराष्टÑात आले. महाराष्टÑात मिळेल तिथे जे गरीबीमुळे शाळेत जावू न शकलेल्या ५० ते १०० मुलांना एकत्र करीत त्यांना शिकविण्याचे काम करतात. ग्रामीण भागात त्यांना पाहण्यासाठी गर्दी जमते.

Web Title: Bhullar Delmanti for spreading education of Avalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.