‘भोजापूर’मध्ये केवळ सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा, टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 02:20 PM2019-03-14T14:20:25+5:302019-03-14T14:20:37+5:30

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणात केवळ पाच ते सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

In Bhojapur, only six percent of useful water supply, scarcity of water | ‘भोजापूर’मध्ये केवळ सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा, टंचाईचे सावट

‘भोजापूर’मध्ये केवळ सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा, टंचाईचे सावट

Next

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणात केवळ पाच ते सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाळा लांबणीवर पडल्यास धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणीयोजना संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावर मनेगावसह १६ गावे तसेच कणकोरीसह पाच गाव नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. पुढील तीन महिने मृत पाणी साठ्यावर योजना अवलंबून राहण्याची चिन्हे आहे.नांदूरशिंगोटे व परिसराचे पिण्याच्या पाण्याचे व शेतीचे भवितव्य भोजापूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गतवर्षी पश्चिम पट्ट्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरून सुध्दा धरणातील पाण्याची पातळी मार्च महिन्याच्या मध्यांवरच खालवली आहे. यावर्षी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामातील पिकांना आवर्तन दिले होते. इतिहासात प्रथमच पोलीस बंदोबस्तात भोजापूर धरणातील आवर्तन सोडण्यात आले होते. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहे.डिसेंबर महिन्यात नांदूरशिंगोटे, दोडी बुद्रूक, दोडी खुर्द व संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरातील पाझर तलावांत पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. सुमारे पंधरा दिवस धरणातून आवर्तन सुरू होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन व धरणातून होणारा बेसुमार पाणी उपसा यामुळे धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. तसेच धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात धरणातील उद्भव विहीरीजवळील पाणीसाठा कमी झाल्याने चर घेऊन विहीरीकडे पाणी वळविण्यात येते.

Web Title: In Bhojapur, only six percent of useful water supply, scarcity of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक