भारत पेट्रोलियमची डिझेल वाहिनी फोडलीलाखो लिटर वाया : तज्ज्ञांकडून इंधन पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:11 AM2017-12-08T00:11:00+5:302017-12-08T00:17:18+5:30

नाशिक/लासलगाव : मनमाडनजीकच्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कार्पोरेशनची मनमाड-मुंबई भूमिगत पाइपलाइन निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे फोडून त्यातून डिझेल चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. गुरुवारी पहाटे हा प्रकार लक्षात येताच भारत पेट्रोलियमच्या अधिकारी व तज्ज्ञांनी तातडीने इंधन पुरवठा खंडित करून पाइपलाइन जोडण्याचे काम सुरू केले असून, या घटनेमागे आंतरराज्यीय टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bharat Petroleum diesel channel fodder licha Via: fuel supply disrupted by experts | भारत पेट्रोलियमची डिझेल वाहिनी फोडलीलाखो लिटर वाया : तज्ज्ञांकडून इंधन पुरवठा खंडित

भारत पेट्रोलियमची डिझेल वाहिनी फोडलीलाखो लिटर वाया : तज्ज्ञांकडून इंधन पुरवठा खंडित

googlenewsNext
ठळक मुद्देभारत पेट्रोलियमची डिझेल वाहिनी फोडलीलाखो लिटर वाया : तज्ज्ञांकडून इंधन पुरवठा खंडित

नाशिक/लासलगाव : मनमाडनजीकच्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कार्पोरेशनची मनमाड-मुंबई भूमिगत पाइपलाइन निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे फोडून त्यातून डिझेल चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. गुरुवारी पहाटे हा प्रकार लक्षात येताच भारत पेट्रोलियमच्या अधिकारी व तज्ज्ञांनी तातडीने इंधन पुरवठा खंडित करून पाइपलाइन जोडण्याचे काम सुरू केले असून, या घटनेमागे आंतरराज्यीय टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पानेवाडीच्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशनच्या इंधन डेपोतून मुंबईसह राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सहा राज्यांना पेट्रोल, डिझेलचा पुरवठा केला जातो. त्यासाठी जमिनीखालून सुमारे सात ते आठ फूट खोल पाइपलाइन टाकण्यात आली असून, अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून डेपोतून अहोरात्र इंधन पुरवठा केला जातो. निफाड तालुक्यातील खानगाव थडी शिवारातील निर्जन व जंगल भागातून ही पाइपलाइन गेली असल्याने काही अज्ञात व्यक्तींनी जमिनीत खड्डा करून पाइपलाइन फोडली व त्यातून इंधन चोरी केली. गुरुवारी पहाटे ही बाब भारत पेट्रोलियम कंपनीच्या तांत्रिक विभागाच्या लक्षात येताच, त्यांनी शोध घेतला असता, खानगाव थडी येथे हा प्रकार निदर्शनास आला. पाइपलाइन फोडण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला असून, त्याच्या सहाय्याने सुमारे आठ फूट खोल खड्डा खणण्यात आला आहे. या खड्ड्यात मोठ्या प्र्रमाणात डिझेल साचलेले असल्याने चोरट्यांनी हजारो लिटर डिझेल गायब केल्याचाही संशय आहे. (पान ७ वर)
भारत पेट्रोलियमची डिझेल वाहिनी फोडली
(पान १ वरून)
इंधन वाहून नेणाºया पाइपलाइनच्या दाबावर परिणाम झाल्यानंतर गुरुवारी पहाटे पानेवाडीतून होणारा पुरवठा तत्काळ बंद करण्यात आला व यंत्राच्या सहाय्याने शोध घेऊन खानगाव थडी येथे सकाळी सुमारे ३० ते ३५ अधिकारी, कर्मचाºयांचे पथक दाखल झाले. जिल्हा प्रशासनाला याची माहिती मिळताच निफाडचे प्रांत अधिकारी महेश पाटील व त्यांच्या सहकाºयांनीही घटनास्थळी धाव घेतली. ज्या ठिकाणी पाइपलाइन फोडण्यात आली आहे ते ठिकाण गोदावरी नदीपासून चारशे मीटर अंतरावर असून, सहजासहजी या भागात कोणी एकटी-दुकटी व्यक्ती जाऊ शकत नाही. शिवाय जमिनीखाली इतका मोठा खड्डा करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो त्यामुळे या घटनेमागे आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यापूर्वीही झाली होती इंधन चोरी
मनमाड-मुंबई पाइपलाइन फोडून इंधन चोरीचा प्रकार यापूर्वीही सिन्नर तालुक्यात घडला होता. त्यावेळीही इंधन चोरांनी या पाइपलाइनला छिद्र पाडून हजारो लिटर इंधनाची चोरी केली होती. मात्र त्याकाळी पेट्रोलियम डेपोमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री नसल्याने नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या खबरीच्या आधारे ही इंधन चोरी उघडकीस आणण्यात येऊन त्यात आठ ते दहा आरोपींना अटक करण्यात आली होती. या टोळीने अनेक महिने टॅँकर भरून पाइपलाइनमधून इंधनाची चोरी केली होती.
च्इंधन वाहून नेणाºया या पाइपलाइनचा दाब इतका प्रचंड असतो की, ती जर फुटली तर साधारणत: २२ फूट उंचीपर्यंत त्याचे कारंजे उडू शकतात, त्यामुळे इंधन चोरट्यांनी या साºया गोष्टीचा विचार करूनच पाइपलाइन डॅमेज करण्याचा प्रयत्न करताना त्याची पुरेपूर काळजी घेण्यात आल्याने या साºया प्रकारात माहितगारांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराज्यीय टोळीचा हातमनमाड-मुंबई पाइपलाइन खानगाव थडी शिवारात फोडून त्यातून इंधन चोरीचा प्रयत्न केला जात असतानाच, दोन दिवसांपूर्वी सदर पाइपलाइन ठाण्याजवळील वशाळा गावाच्या हद्दीतदेखील अशाच प्रकारे फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. परंतु हा प्रयत्न होत असताना पेट्रोलियम डेपोचा धोक्याचा सिग्नल वाजल्याने तत्काळ पाइपलाइन डॅमेजचा शोध घेण्यात आला असता, वशाळा येथील प्रकार लक्षात आला.

Web Title: Bharat Petroleum diesel channel fodder licha Via: fuel supply disrupted by experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.