सेनेचे संपर्कप्रमुखपद भाऊसाहेब चौधरींकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:26 AM2018-04-16T00:26:27+5:302018-04-16T00:26:27+5:30

नाशिक : शिवसेनेच्या महानगरप्रमुख बदलाच्या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी हे पद सोडताच त्यांच्या जागी भाऊसाहेब चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने त्यांचे नाव अधिकृतरीत्या घोषित करण्यात आले असून, त्याचबरोबर जिल्ह्यातील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचीदेखील घोषणा करण्यात आली आहे.

Benaiah Chowdhury, Chief of Army Staff! | सेनेचे संपर्कप्रमुखपद भाऊसाहेब चौधरींकडे!

सेनेचे संपर्कप्रमुखपद भाऊसाहेब चौधरींकडे!

Next
ठळक मुद्देफेरबदल : महिला आघाडीची नूतन कार्यकारिणी घोषितअजय चौधरी यांना धक्का देण्याचा पहिला प्रयत्न हस्तक्षेपाला कंटाळून त्यांनी नाशिकच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची विनंती

नाशिक : शिवसेनेच्या महानगरप्रमुख बदलाच्या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी हे पद सोडताच त्यांच्या जागी भाऊसाहेब चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने त्यांचे नाव अधिकृतरीत्या घोषित करण्यात आले असून, त्याचबरोबर जिल्ह्यातील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचीदेखील घोषणा करण्यात आली आहे.
शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून गटबाजी वाढीस लागत होती. त्याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवरूनदेखील फेरबदलांना सुरुवात झाली होती. महापालिका निवडणुकीत तर ही गटबाजी अधिक उफाळून आल्यानंतर राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, सेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याचवेळी पक्षातील बदलाची सूचक नांदी मानली जात होती. अलीकडेच पक्षाचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना हटवून त्यांच्या जागी दोन विधानसभा मतदारसंघासाठी सचिन मराठे आणि दोन मतदारसंघांसाठी महेश बडवे यांची नियुक्ती करण्यात आली. हा निर्णय घेताना संपर्कप्रमुख अजय चौधरी यांना पूर्णत: अंधारात ठेवण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे नाराज झालेल्या चौधरी यांनी नाशिकमध्ये येऊन खडे बोल सुनावले होते. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या नेत्याकडे जाऊन नाशिकच्या संपर्क प्रमुखपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. ती मान्य करून शिवसेना अध्यक्षांनी त्यांच्या ऐवजी भाऊसाहेब चौधरी यांची नियुक्त केली. भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी होती. त्यांच्याकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आल्याने आता संपूर्ण जिल्ह्णाची सूत्रे देण्यात आली आहे.
याशिवाय गेल्या सात ते आठ महिन्यांपूर्वी बरखास्त करण्यात आलेल्या महिला कार्यकारिणीला यानिमित्त मुहूर्त लागला आहे. नाशिक महानगर प्रमुखपदी श्यामला दीक्षित या कायमच आहेत. उर्वरित कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. याशिवाय देवळाली विधानसभा, इगतपुरी विधानसभा आणि नाशिक ग्रामीण याप्रमाणे महिला आघाडी घोषित करण्यात आल्या आहेत. स्वीकृत नगरसेवक नियुक्तीत प्रयत्ननाशिकचे संपर्कप्रमुख म्हणून काम करताना अजय चौधरी
यांना धक्का देण्याचा पहिला प्रयत्न स्वीकृत नगरसेवक नियुक्तीत झाला. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीसाठी अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांची दावेदारी, स्थायी समितीचे सदस्य नियुक्ती आणि आता महानगरप्रमुखाचा बदल अशाप्रकारे एकेक क्रमाने घटना घडल्याने याच हस्तक्षेपाला कंटाळून त्यांनी नाशिकच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची विनंती केल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Benaiah Chowdhury, Chief of Army Staff!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.