खाडी झाली भंगारमुक्त; डेब्रीज खतप्रकल्पावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:31 AM2017-10-14T00:31:27+5:302017-10-14T00:31:33+5:30

अंबड लिंकरोडवरील बहुचर्चित खाडी परिसरात शुक्रवारी महापालिकेमार्फत भंगार बाजार हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. दिवसभरात १३० ट्रक माल उचलण्यात येऊन तो सातपूर क्लब हाउस येथे नेण्यात आला, तर सुमारे ४१ ट्रक भरून डेब्रीज, कचरा व टाकाऊ साहित्य खतप्रकल्पावर डम्पिंगसाठी रवाना करण्यात आले. दुसºया दिवशीही काही व्यावसायिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला.

 The bay leaves were scratched; DEBREES MANUFACTURING | खाडी झाली भंगारमुक्त; डेब्रीज खतप्रकल्पावर

खाडी झाली भंगारमुक्त; डेब्रीज खतप्रकल्पावर

Next

सिडको/सातपूर : अंबड लिंकरोडवरील बहुचर्चित खाडी परिसरात शुक्रवारी महापालिकेमार्फत भंगार बाजार हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. दिवसभरात १३० ट्रक माल उचलण्यात येऊन तो सातपूर क्लब हाउस येथे नेण्यात आला, तर सुमारे ४१ ट्रक भरून डेब्रीज, कचरा व टाकाऊ साहित्य खतप्रकल्पावर डम्पिंगसाठी रवाना करण्यात आले. दुसºया दिवशीही काही व्यावसायिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, महापालिकेने कोणालाही न जुमानता आपली मोहीम फत्ते केली. शनिवारीही (दि.१४) सदर मोहीम राबविली जाणार आहे.  महापालिका व पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्तरीत्या भंगार बाजार हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेच्या दुसºया दिवशी सकाळी ९ वाजता पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या सहाही पथकांनी बहुचर्चित खाडी परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. त्यात काही भंगार व्यावसायिकांनी उभारलेले पत्र्यांचे शेड तसेच पक्की बांधकामे उद्ध्वस्त करण्यात आली. ज्या व्यावसायिकांनी स्वत:हून भंगार काढण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्यांना त्यासाठी संधी देण्यात आली. शुक्रवारीही काही व्यावसायिकांनी कागदपत्रे दाखवून कारवाई थांबविण्याची विनंती केली. परंतु, पथकाने कोणालाही न जुमानता आपली कारवाई सुरूच ठेवली. एकीकडे महापालिकेची कारवाई सुरू असताना काही व्यावसायिकांकडून मात्र स्वत:हून माल उचलण्याची धावपळ सुरू होती. महापालिकेने दिवसभरात १३० ट्रक माल जप्त करत तो सातपूर क्लब हाउसवरील जागेत नेला, तर सुमारे ४१ ट्रकभर डेब्रीज, टाकावू साहित्य व कचरा खतप्रकल्पावर नेण्यात आला. खतप्रकल्प ते भंगार बाजार यादरम्यान वाहतुकीला वेळ लागत असल्याने माल उचलण्यातही विलंब लागत होता. शुक्रवारी मोहिमेप्रसंगी सुमारे ४५० पोलीस, मनपाचे सुमारे ३५० कर्मचारी तसेच ६ क्रेन, २१ जेसीबी, ३० डम्पर व ३२ ट्रक-ट्रॅक्टर तैनात होते. शनिवारी (दि.१४) सदर मोहीम पुढे सुरूच राहणार असून, माल वाहतुकीसाठी १२ डम्पर आणखी वाढविण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली. दरम्यान, दिवसभर एकूणच मोहिमेवर अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व रमेश पवार तसेच अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम स्वत: ठाण मांडत लक्ष ठेवून होते. शुक्रवारी खाडीभागासह संजीवनगर ते रामकृष्णनगर परिसरातील बरेचसे भंगार साहित्य उचलण्यात आले आहे.
शेड वाचविण्यासाठी महिलांचा आधार
महापालिकेने अनधिकृत शेड हटविण्यास सुरुवात केल्यानंतर काही ठिकाणी व्यावसायिकांनी महिलांसह कुटुंबीयांना आणून बसविले होते. सदर शेडमध्ये रहिवासी राहत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. महापालिकेच्या पथकाने तूर्त जेथे रहिवासी आहेत तेथे कारवाई न करण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, मोहीम संपण्यापूर्वी शेडमध्ये खरोखरच रहिवासी राहतात काय याची खातरजमा करून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
स्थगिती आदेशाला केराची टोपली
एका व्यावसायिकाने कारवाईस विरोध दर्शविला आणि कोर्टाकडून स्थगिती आदेश येत असल्याचे सांगत तोपर्यंत कारवाई करू नये, अशी भूमिका घेतली. परंतु, पथकाने त्याचे काहीही न ऐकता कारवाई सुरू केली व पक्के बांधकाम तोडून टाकले. काही वेळानंतर सदर व्यावसायिकाने स्थगिती आदेश आल्याचे सांगितले. परंतु, तोपर्यंत महापालिकेने आपले काम फत्ते केले होते. एका व्यावसायिकाने मोठ्या प्रमाणावर लाकडी फळ्यांचा साठा करून ठेवलेला होता. सदर साठा उचलण्यासाठी सुमारे १५ ट्रक लागले.

Web Title:  The bay leaves were scratched; DEBREES MANUFACTURING

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.