चार्जींग करताना बॅटरीचा स्फोट; इलेक्ट्रीक बाइक वापरताहेत सावधान....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 02:47 PM2021-07-12T14:47:30+5:302021-07-12T14:50:59+5:30

सोसायटीच्या वीज मीटर असलेली संपुर्ण पेटी जळून राख झाली. यामुळे या इमारतीतील सर्व रहिवाशांच्या वीजमीटरचे नुकसान होऊन वीजपुरवठाही खंडीत झाला.

Battery exploding while charging; Beware of using electric bikes ....! | चार्जींग करताना बॅटरीचा स्फोट; इलेक्ट्रीक बाइक वापरताहेत सावधान....!

चार्जींग करताना बॅटरीचा स्फोट; इलेक्ट्रीक बाइक वापरताहेत सावधान....!

googlenewsNext
ठळक मुद्देआगीचा भडका अन‌् दुचाकीसह रहिवाशांच्या वीज मीटरचा कोळसारहिवाशांच्या वीजमीटरचे नुकसान

नाशिक : पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे अलिकडे नागरिकांचा इलेक्ट्रीक बाइक खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. इलेक्ट्रीक बाईक वापरताना आवश्यक ती खबरादारी घेणेही तितकेच गरजेचे आहे. इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी भागात अशाच एका इलेक्ट्रीक बाइकची बॅटरी चार्जिंग करताना बॅटरी जळून लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत दुचाकीचा कोळसा झाला. ही बाब वेळीच लक्षात आल्याने अग्नीशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात येऊन वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.


इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पांडवनगरी परिसरात असलेल्या 'ऐश्वर्या रेसिडेन्सी'च्या वाहनतळातील येथील रहिवाशी सुरजित सिंग यांनी सोमवारी (दि.१२) सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या मालकीची इलेक्ट्रीक दुचाकी चार्जिंगसाठी अपार्टमेंटच्या वाहनतळात असलेल्या वीज मीटर पेटीच्या जवळ मुख्य स्वीचमध्ये जोडणी करुन लावली होती. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रमाणापेक्षा जास्त बॅटरी चार्ज झाल्याने तीचा स्फोट होऊन दुचाकीला मोठी आग लागली. यामुळे सोसायटीच्या वीज मीटर असलेली संपुर्ण पेटी जळून राख झाली. यामुळे या इमारतीतील सर्व रहिवाशांच्या वीजमीटरचे नुकसान होऊन वीजपुरवठाही खंडीत झाला. घटनेची माहिती अग्नीशमन दलाला मिळताच सिडको उपकेंद्राचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविली. यावेळी इंदिरानगर पोलीसही घटनास्थळी पोहचले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.
---

Web Title: Battery exploding while charging; Beware of using electric bikes ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.