नगरपालिकेचा निषेध : भगूरची बाजारपेठ बंद; व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 02:32 PM2019-07-18T14:32:36+5:302019-07-18T14:33:12+5:30

भगूर गावात प्रवेशासाठी रेल्वे भुयारी बोगदा मार्गाच्या कामाला मंजूरी दिली. त्यासाठी नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाने ३ कोटी ९३ लाख ४१ हजार रूपये भुसावळ रेल्वे प्रशासनाला २०१६ साली अदा केले आहेत. भुयारी मार्गाच्या कामाला रेल्वे मार्गाजवळी मटन मार्केटच्या अतिक्रमणाचा अडथळा निर्माण झाला आहे.

The ban on municipal corporation: closed the market of Bhagur; Behavior jam | नगरपालिकेचा निषेध : भगूरची बाजारपेठ बंद; व्यवहार ठप्प

नगरपालिकेचा निषेध : भगूरची बाजारपेठ बंद; व्यवहार ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाने ३ कोटी ९३ लाख ४१ हजार रूपये निधी दिला

नाशिक : येथील नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या भगूर नगरपालिका प्रशासनाने मटनमार्केट पाडून तेथून भुयारी बोगदा (अंडरपास) तयार करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनला सहकार्य केले नाही. त्यामुळे आता उड्डाणपूलाचे काम पुर्ण झाल्यानंतर तेथून मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहे. परिणामी भगूरच्या व्यावसायिकांचा व्यवसाय धोक्यात येईल, म्हणून नगरपालिकेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आज भगूर बंद ठेवण्याचा निर्णय घेत कडकडीत बंद पाळला.
भगुरच्या उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून तेथील रेल्वे गेट बंद होईल. त्यामुळे भगुरच्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय धोक्यात सापडतील ते टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भगूर गावात प्रवेशासाठी रेल्वे भुयारी बोगदा मार्गाच्या कामाला मंजूरी दिली. त्यासाठी नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाने ३ कोटी ९३ लाख ४१ हजार रूपये भुसावळ रेल्वे प्रशासनाला २०१६ साली अदा केले आहेत. भुयारी मार्गाच्या कामाला रेल्वे मार्गाजवळी मटन मार्केटच्या अतिक्रमणाचा अडथळा निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करूनदेखील हे अतिक्र मण भगूर पालिका प्रशासनाकडून हटविले जात नसल्याने व्यापा-यांनी संतप्त होऊन गुरूवारी (दि.१८) भगूर बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेत अंमलबजावणी केली.
मागील सहा महिन्यापांसून त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी भगूर पालिकेसोबत पत्र व्यवहारही केला गेला आहे तरीदेखील भगूर मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांनी अद्याप दखल घेतली नसल्याचा आरोप व्यापा-यांनी केला आहे. याकरीता रेल्वे आधिकारी यांनी भगुरला येऊन ‘आम्हाला दोन दिवसात मटन मार्केटचे अतिक्र मण काढून द्या, अन्यथा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांनी दिलेला निधी पुन्हा परत पाठवून देऊ’ त्यानंतर भुयारी मार्गाचे काम हे अनिश्चितकाळासाठी लांबणीवर पडेल, असे सांगितले. त्यामुळे संतप्त व्यावसायिकांनी एकत्र येऊन बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

मी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन सांगितले आहे.भगुर बोगद्याच्या कामासाठी अडथळा ठरणारे अतिक्र मण काढण्यासंदर्भात भगुर नगरपालिकेला आदेशित करावे.
- हेमंत गोडसे, खासदार

मटनमार्केटचे अतिक्रमणाचा अडथळा नगरपालिका अथवा रेल्वे प्रशासनाने कोणीही पुढाकार घेऊन दूर करावा आणि भुयारी मार्गाच्या कामाला प्रारंभ करावा, अतिक्रमण हटविण्यासाठी येणारा खर्च व्यावसायिक वर्गणी काढून देण्यास तयार आहे.
- शांताराम शेटे , व्यापारी असोसिएशनचे

नगरपालिका ठराव झालेला आहे. रेल्वे प्रशासनाला पालिकेच्या वतीने बोगदा निधी दिलेला आह.े विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली तरीही नवीन आलेले रेल्वे अधिकारी व्यापा-यांना चुकीची माहिती सांगून दिशाभूल करीत आहेत.
- काकासाहेब देशमुख, माजी उपाध्यक्ष

शिवाजी चौकात व्यापारी प्रतिनिधी यांना सांगितले की रेल्वेच्या अधिकारी यांनी त्यांना बोगदा तयार करताना जो मटन मार्केटचा अडथळा येईल तो काढून टाकावा जर रेल्वेला महाराष्ट्र शासनाने पैसे दिले आहे तर रेल्वेनेच काढावे रेल्वेस आमचे सहकार्य राहिल आम्ही का खर्च करायचा असे सांगितले.

- विजय करंजकर, शिवसेना जिल्हाप्रमुख

Web Title: The ban on municipal corporation: closed the market of Bhagur; Behavior jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.