औरंगाबादरोडवर दुचाकीच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:09 AM2019-03-18T01:09:45+5:302019-03-18T01:10:44+5:30

आडगाव शिवारातील औरंगाबादरोडवर असलेल्या रामांजनेय मंदिरासमोरून पायी जाणाऱ्या इसमाला भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बोरगड एकतानगर येथील तुळशीराम दगडू शेलार हे ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Aurangabadodder killed one in a wheelchair | औरंगाबादरोडवर दुचाकीच्या धडकेत एक ठार

औरंगाबादरोडवर दुचाकीच्या धडकेत एक ठार

Next

पंचवटी : आडगाव शिवारातील औरंगाबादरोडवर असलेल्या रामांजनेय मंदिरासमोरून पायी जाणाऱ्या इसमाला भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बोरगड एकतानगर येथील तुळशीराम दगडू शेलार हे ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरगड येथील तुळशीराम शेलार हे गुरुवारी (दि.१४) सकाळी दहा वाजेच्या सुमारास रामांजनेय मंदिरासमोर असलेल्या रस्त्यावरून पायी जात असताना भरधाव वेगाने जाणाºया मोटारसायकल क्रमांक एमएच १५ बी वाय. ५०३० ने जबर धडक दिली. या अपघातात शेलार यांना दुखापत होऊन ते रस्त्यावर पडले.
या घटनेत त्यांना डोक्याला व हाताला गंभीर मार लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघात प्रकरणी औरंगाबाद रोडवर राहणाºया शिवाजी माणिकराव लहाने
यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दुचाकीस्वाराविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल
करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Aurangabadodder killed one in a wheelchair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.