औरंगाबादच्या विद्यार्थिनीची नाशिकमध्ये आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:10 AM2018-03-24T01:10:43+5:302018-03-24T01:10:43+5:30

नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण कार्यालयाजवळ असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि.२३) गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरी एकनाथ जाधव (२१,रा़ औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती नर्सिंगच्या द्वितीय वर्गात शिक्षण घेत होती़

 Aurangabad girl's suicide in Nashik | औरंगाबादच्या विद्यार्थिनीची नाशिकमध्ये आत्महत्या

औरंगाबादच्या विद्यार्थिनीची नाशिकमध्ये आत्महत्या

Next

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण कार्यालयाजवळ असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि.२३) गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरी एकनाथ जाधव (२१,रा़ औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती नर्सिंगच्या द्वितीय वर्गात शिक्षण घेत होती़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळ समाजकल्याण विभागाचे विभागीय कार्यालय आहे़ या कार्यालयाजवळच मुलींचे वसतिगृह असून, या ठिकाणी गौरी जाधव ही विद्यार्थिनी राहत होती़ नाशिक शहरातील गणपतराव आडके नर्सिंग महाविद्यालयात द्वितीय वर्गात शिक्षण घेत असलेल्या गौरीने दुपारच्या सुमारास वसतिगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली़ दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तत्काळ मुंबई नाका पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली़  पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा केला असून, शवविच्छेदनासाठी तो जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे़ दरम्यान, गौरी जाधवच्या आत्महत्येचे खरे कारण पोलीस तपासानंतरच पुढे येणार आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
आत्महत्येपूर्वी चिठ्ठी
मुंबई नाका पोलीस शासकीय वसतिगृहात पोहोचल्यानंतर त्यांनी गौरीने आत्महत्या केलेल्या खोलीची तपासणी केली़ गौरीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, प्रेमप्रकरणातून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़

Web Title:  Aurangabad girl's suicide in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.