साडेतीन हजार विवाहेच्छुकांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:06 AM2017-12-26T00:06:39+5:302017-12-26T00:21:11+5:30

महानगर तेली समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विवाहेच्छुक युवक-युवतींच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये सुमारे तीन हजार ८५० युवक-युवतींसह त्यांच्या पालकांनी हजेरी लावली.

The attendance of three and a half thousand scholars | साडेतीन हजार विवाहेच्छुकांची उपस्थिती

साडेतीन हजार विवाहेच्छुकांची उपस्थिती

Next

नाशिक : महानगर तेली समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विवाहेच्छुक युवक-युवतींच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये सुमारे तीन हजार ८५० युवक-युवतींसह त्यांच्या पालकांनी हजेरी लावली.  सालाबादप्रमाणे यंदाही तेली समाजाच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. भाभानगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या या मेळाव्याप्रसंगी उद्घाटक म्हणून जनार्दन बेलगावकर उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, नगरसेवक गजानन शेलार, प्रवीण चांदवडकर, विक्रांत चांदवडकर, संतोष चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बेलगावकर म्हणाले, मुलामुलींचा विवाह ठरविताना तडजोड करण्याचा प्रयत्न करावा. तडजोड केल्यास विवाह जुळून येण्यास मदत होेते. तसेच संयोजक वाघ यांनी यावेळी मनोगतातून समाजातील विवाहसंस्काराविषयी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, प्रत्येक समाजात विवाहसंस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रत्येकाने आपआपल्या जातीचा अभिमान बाळगावा. विवाहेच्छुकांचा पालक परिचय मेळावा आयोजित करण्यामागे हा मुख्य उद्देश असतो. आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना अशा प्रकारच्या मेळाव्यांची मोठी मदत होते. अनुरूप जोडीदाराचा शोध अशा मेळाव्यांच्या माध्यमातून पूर्ण होतो.  दरम्यान, चांदवडकर यांनी कांचन कर्डिले यांनी सुरू केलेल्या विवाहाच्या संकेतस्थळाविषयीची माहिती दिली. यामुळे मेळाव्यानंतरही विवाहेच्छुकांना अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी या संकेतस्थळाची मदत होणार आहे. तसेच समाजातील तरुण-तरुणींनी अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्राकडे वळण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी विविध तरुण-तरुणींची संपूर्ण माहिती असलेली वधू-वर सूचक पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. या मेळाव्याला समाजातील सुशिक्षित, नवशिक्षित नोकरदार व व्यावसायिकांसह शेतकरी वर्गातील विवाहेच्छुक तरुण-तरुणी व त्यांचे पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन योगिता क्षीरसागर, सीमा पेठकर यांनी केले. 
नवनिर्वाचित नगरसेवकांसह समाजभूषणांचा गौरव 
विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून समाजाचा नावलौकिक उंचाविणाºया समाजभूषण व्यक्तींचा या मेळाव्याच्या निमित्ताने गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. भूषण कर्डिले, नगरसेवक स्वप्निल शेलार, शीतल उगले, इगतपुरीचे नगरसेवक उमेश कस्तुरे, नंदुरबारचे नगरसेवक प्रवीण चौधरी, रेखा चौधरी, गौरव चौधरी, तळोद्याचे नगरसेवक सुभाष चौधरी, गायत्री चौधरी या नवनिर्वाचित नगरसेवकांसह तृप्ती चांदवडकर (रौप्य- तलवारबाजी), निंबा चौधरी (व्यसनमुक्ती), मोहन कोरडे, यू. बी. पवार (शहर अभियंता) यांचाही गौरव करण्यात आला.

Web Title: The attendance of three and a half thousand scholars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक