मारहाण प्रकरणी बच्चू कडू वसतिगृहात धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:23 AM2018-10-23T01:23:01+5:302018-10-23T01:23:33+5:30

मद्यधुंद काळजीवाहकाने अंधशाळेतील चार अंध विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणाची दखल प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी घेतली असून, येत्या दोन दिवसांत ते नाशिकमधील समाजकल्याणच्या अंधशाळेत धडकणार असल्याचे वृत्त आहे.

 In the assault case, the child will be hit in a bitter hostel | मारहाण प्रकरणी बच्चू कडू वसतिगृहात धडकणार

मारहाण प्रकरणी बच्चू कडू वसतिगृहात धडकणार

Next

नाशिक : मद्यधुंद काळजीवाहकाने अंधशाळेतील चार अंध विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणाची दखल प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी घेतली असून, येत्या दोन दिवसांत ते नाशिकमधील समाजकल्याणच्या अंधशाळेत धडकणार असल्याचे वृत्त आहे.  अंध विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या कर्मचाºयाला अद्यापही ताब्यात घेण्यात आलेले नाहीच शिवाय मारहाण झालेल्या एका विद्यार्थ्याच्या कानाला गंभीर दुखापत झाल्याने बच्चू कडू याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना जाब विचारणार आहेत. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाकडे पाठ फिरविली असताना कडू यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.  नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषदेला अपंगांवर होणाºया दोन टक्के खर्चाचा जाब आमदार कडू यांनी विचारल्यानंतर संपूर्ण प्रशासन हलले होते. या दोन्ही स्वराज्य संस्थांमध्ये अपंगांवर करण्यात येणाºया खर्चाला कात्री लावण्यात आल्याची बाब उघड झाल्यानंतर कडू यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मीना आणि तत्कालीन मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांना चांगलेच धारेवर धरले हाते. कृष्णा यांच्यावर तर कडू यांनी हातही उचलल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता कडू पीडित अंध विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर जिल्हा परिषदेत धडकणार असल्याने त्यांच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.  आमदार कडू यांच्या नाशिकमधील काही निकटवर्तीयांनी याबाबतची माहिती दिली असून, दोन दिवसात कधीही कडू नाशिकमध्ये दाखल होतील, असे सांगण्यात आले. यावेळी ते अंधशाळेतील पीडित विद्यार्थ्यांशी चर्चा करणार असून, येथील अधीक्षकांकडूनही ते माहिती घेणार आहेत. अपंगांसाठी कार्य करणाºया प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची माहिती कडू यांना दिल्यानंतर त्यांनी आपण नाशिकमध्ये येत्या दोन दिवसात कधीही येऊ, असे सांगितल्याचे समजते.
अक्षम्य दुर्लक्ष
अंध शाळेतील चार विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा निंदनीय प्रकार घडल्यानंतर मारहाण करणारा कर्मचारी आपल्या गावी निघून गेला असून, तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सदर बाब उघडकीस आल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने येथील अधीक्षकेला निवेदन देण्यात आल्यानंतर संबंधितावर दोन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनीही केवळ गुन्हा नोंदविण्याचे सोपस्कार केले, मात्र संबंधित कर्मचाºयाला अटक करण्यात आलेली नाही. नाशिकमधील एकाही लोकप्रतिनिधीने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

Web Title:  In the assault case, the child will be hit in a bitter hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.