नांदगाव शहरात कृत्रिम पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 05:34 PM2019-04-26T17:34:15+5:302019-04-26T17:42:36+5:30

नांदगाव : नांदगाव शहराचे पाण्याचे आवर्तन वाढत्या गरमी बरोबरच अधिकाधिक लांबणीवर पडत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी गाड्या व पिण्याचे पाणी पुरवणारे जार वाहून नेणाºया गाड्या गल्लोगल्ली धावतांना दिसून येत आहेत. गिरणा धरणाच्या योजनेतील प्रशासकीय व तांत्रिक अडचणीमुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

 Artificial water scarcity in Nandgaon city | नांदगाव शहरात कृत्रिम पाणी टंचाई

नांदगाव शहरात कृत्रिम पाणी टंचाई

googlenewsNext
ठळक मुद्दे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

नांदगाव : नांदगाव शहराचे पाण्याचे आवर्तन वाढत्या गरमी बरोबरच अधिकाधिक लांबणीवर पडत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी गाड्या व पिण्याचे पाणी पुरवणारे जार वाहून नेणाºया गाड्या गल्लोगल्ली धावतांना दिसून येत आहेत. गिरणा धरणाच्या योजनेतील प्रशासकीय व तांत्रिक अडचणीमुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
शहरास मुख्य पाणी पुरवठा गिरणा धरण प्रादेशिक योजनेतून होत असतो. थकबाकीचे कारण पुढे करून वारंवार पाणी पुरवठा तोडण्याची धमकी देणार्या जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची ८५ लाख रु पयांची थकबाकी चुकती करून जिल्हा परिषदेचे ऋण फेडल्याने यापुढे पाण्याचे आवर्तनं वेळेवर येईल अशी आशा नांदगाव करांच्या मनात निर्माण झाली होती.
सुरवातीचे काही आवर्तन त्याप्रमाणे आले देखील. पण महिना दीड महिन्यात येरे माझ्या मागल्याची पुनरावृत्ती होत गेली. आठ दिवसांवर आलेला पाणी पुरवठा पंधरा ते वीस दिवसांवर गेला आहे. घरातले पाणी संपले कि... केव्हा येणार पाणी.... अशी विचारणा सुरु होते. पाणी पुरवठा करणाºया यंत्रणेकडे त्याचे उत्तर नसते व आशेच्या मृगजळामागे नांदगावकर धावत असतात.
गिरणा धरणात सुमारे ६००० द.ल.घ.फु जलसाठा आहे. त्यावर अवलंबून पाणी पुरवठा योजनांसाठी तो पुढील दीड ते दोन वर्ष पुरेल एवढा असल्याची माहिती आहे. मात्र जलवाहिनी फुटणे, पंप नादुरुस्त होणे, कर्मचारी गैरहजेरीमुळे वेळापत्रक विस्कळीत होणे अशा अनेक कारणांमुळे पाणी पुरवठ्याची अक्षरश: वाट लागली आहे. तालुक्यात एक दोन ठिकाणचा अपवाद वगळता कुठे हि पृष्ठभागावर पाणी नाही. विहिरी कोरड्या पडल्या असून ४५० ते ६०० फुट खोलीवरचे पाणी वापरायला व नाईलाजाने अथवा नकळत पिण्यात आल्याने नागरिक आजारी पडत आहेत. लिंबुपाणी, सरबते बर्फाचे गोळे यांचा सिझन आहे. त्यात कोणते पाणी असते? असेच राहिले तर नजीकच्या काळात किडनी, यकृत व कर्करोगाने आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल असे मत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व्यक्त करत आहेत.
सद्यस्थितीत सुरु असलेल्या योजनेचे आयुष्य संपले आहे नवीन योजनेच्या सवंग घोषणा केल्या जातात. परंतु पावले उचलली जात नाहीत. पोहोºयात पाणी असून ही नांदगावकरांच्या नशिबी पाण्यासाठी वणवण भटकणे आले आहे.

Web Title:  Artificial water scarcity in Nandgaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.