कलिंगडचे आगमन; मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 07:22 PM2019-03-10T19:22:34+5:302019-03-10T19:23:07+5:30

उन्हाची तीव्रता व असह्य उष्णतामान या पार्श्वभूमीवर कलिंगडाचा वापर वाढला आहे. मुंबई भागातील डहाणू, पालघर या खाडीपट्यात मोठ्या प्रमाणावर कलिंगडाचे उत्पादन घेण्यात येते. त्याबरोबर अलिबाग परिसरातही कलिंगड उत्पादनाचा नावलौकिक आहे.

The arrival of Kalandh; Demand increase | कलिंगडचे आगमन; मागणीत वाढ

कलिंगडचे आगमन; मागणीत वाढ

Next

वणी : उन्हाची तीव्रता व असह्य उष्णतामान या पार्श्वभूमीवर कलिंगडाचा वापर वाढला आहे. मुंबई भागातील डहाणू, पालघर या खाडीपट्यात मोठ्या प्रमाणावर कलिंगडाचे उत्पादन घेण्यात येते. त्याबरोबर अलिबाग परिसरातही कलिंगड उत्पादनाचा नावलौकिक आहे.
मातीमिश्रित वाळूमध्ये कलिंगडाची लागवड करण्यात येते. प्रामुख्याने दमट व शितोष्ण हवामान यास या पिकाला अनुकूल आहे. ६ बाय ४ इंचच्या अंतरात १११० ते १३०० वेलीची लागवड करण्यात येते. नामधारी व किरण अशा जातीच्या लागवडीकडे उत्पादकांचा विशेष कल असतो. इतर जातीच्या कलिंगडाच्या तुलनेत या जातीचे उत्पादन अधिक होते अशी उत्पादकांची भावना आह.े फळ पक्कतेसाठी १०० ते १२० दिवसाचा कालावधी लागतो.
याबरोबर रासायनिक प्राक्रि यांचा वापर केल्यास यापेक्षा कमी दिवसात फळ परिपक्व होते. लागवडीच्या वेळी कुजलेले शेणखत अंदाजे २५ गाड्या एका एकरासाठी वापरण्यात येता. तसेच नत्र, स्फुरद व पालाश या रासयानिक खतांचाही वापर करण्यात येतो. चांगली निचरा होणारी व वापरात असणारी जमीन यास आवश्यक असते. कलिंगडाचे वजन दोन ते दहा किलो आकारमानावर अवलंबून असते.
एका वेलीस अंदाजे २ ते ३ कलिंगड येतात. म्हणजे अंदाजे २२०० ते २८०० कलिंगडे एका एकरात उत्पादित होतात. कलिंगड उत्पादनाचा एकरी खर्च सुमारे ५० हजारांच्या जवळपास येतो. त्या तुलनेत अंदाजे एक लाखाच्या पुढे उत्पन्न मिळते. दरम्यान डहाणू, पालघर अलिबाग या पट्यातुन टनाच्या हिशोबाने घाऊक व्यापारी कलिंगडाची खरेदी करतात तद्नतर स्थानिक बाजारपेठमधे नगावर कालिंगडाची विक्र ी करण्यात येते.
रस्त्यालगत आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची विक्र ी करण्यासाठी दुकाने थाटण्यात येतात कलिंगडाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते तसेच ठिबक सिंचनाच्या माध्यमातुनही उत्पादने घेण्याकडे उत्पादकाचा कल असतो फळाचा आकार व रंग यावर फळाच्या परिपक्कतेचा अंदाज येतो दिर्घकाळ टिकणारे फळ म्हणुन कलिंगडाची ओळख असुन दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्यात काही वर्षापूर्वी कलिंगड उत्पादनाचा उपक्र म राबविला होता मात्र पर्यायी उत्पादनाच्या माध्यमातुन तुलनात्मक समाधानकारक अर्थप्राप्ती मुळे हे उत्पादन घेणे बंद झाल्याची माहिती जाणकारांनी दिली. उत्पादकांना कलिंगड खरेदी विक्र ीसाठीचे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समतिी पारदर्शी व सोयीचे माध्यम असून येथेही मोठी आर्थिक उलाढाल होते उष्णतामानाचा सामना करण्यासाठी बहुविविध पर्याय उपलब्ध आहेत मात्र कलिंगडाचे आकर्षण अशा वातावरणात सर्वानाच असते ते कालिंगडाच्या दुकानातील विक्र ी व्यवहाराच्या गतिमानतेतुन दिसुन येते

Web Title: The arrival of Kalandh; Demand increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.