‘टीमवर्क’मुळे सेना बाजी मारेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:46 AM2018-06-07T00:46:16+5:302018-06-07T00:46:16+5:30

नाशिकरोड : विधान परिषद निवडणुकीत ज्या टीमवर्कने विजय मिळविला त्याचप्रमाणे टीडीएफच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही बाजी मारेल, असा विश्वास सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी मेळाव्यात बोलताना केला.

The army will beat the teamwork | ‘टीमवर्क’मुळे सेना बाजी मारेल

‘टीमवर्क’मुळे सेना बाजी मारेल

Next
ठळक मुद्देशिवसेना पुरस्कृत उमेदवाराच्या प्रचार मेळाव्यात बोलताना सहकार राज्यमंत्री दादा भुसे. समवेत पदाधिकारी.

नाशिकरोड : विधान परिषद निवडणुकीत ज्या टीमवर्कने विजय मिळविला त्याचप्रमाणे टीडीएफच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही बाजी मारेल, असा विश्वास सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी मेळाव्यात बोलताना केला.
टीडीएफ व शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आनंदनगर येथील कदम लॉन्समध्ये बुधवारी (दि.६) दुपारी मेळावा घेण्यात आला. यावेळी बोलताना भुसे म्हणाले की, टीडीएफचे दराडे यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला असून, शिवसेना प्रचारात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
टीडीएफचे नेते संभाजी पाटील यांनी टीडीएफचे अधिकृत उमेदवार दराडेच असून, मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघटना यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. शिक्षक, संस्था यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेने दराडे यांना पुरस्कृत केले आहे. यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, उमेदवार किशोर दराडे, पी. एल. देशमुख, संजय चव्हाण यांची भाषणे झाली. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार नरेंद्र दराडे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सचिन मराठे, जगन आगळे, निवृत्ती जाधव, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर आदी उपस्थित होते.

Web Title: The army will beat the teamwork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.