राजीवनगरमध्ये दरवाजा ठोठावून ओरबाडले महिलेचे मंगळसूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:44 PM2019-05-10T23:44:08+5:302019-05-11T00:04:46+5:30

शहरातील पोलीस वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत असताना चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. इंदिरानगरच्या राजीवनगर परिसरात गुरुवारी (दि.९) घराचा बंद दरवाजा ठोठावून एका महिलेला अज्ञात चोरट्याने सुऱ्याचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने तोडून नेल्याचा प्रकार घडल्याने परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 Arambadale woman's mangalsutra by knocking her door in Rajivnagar | राजीवनगरमध्ये दरवाजा ठोठावून ओरबाडले महिलेचे मंगळसूत्र

राजीवनगरमध्ये दरवाजा ठोठावून ओरबाडले महिलेचे मंगळसूत्र

googlenewsNext

इंदिरानगर : शहरातील पोलीस वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत असताना चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. इंदिरानगरच्या राजीवनगर परिसरात गुरुवारी (दि.९) घराचा बंद दरवाजा ठोठावून एका महिलेला अज्ञात चोरट्याने सुऱ्याचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने तोडून नेल्याचा प्रकार घडल्याने परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात एकीकडे हेल्मेट सक्ती आणि वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस ठिकठिकाणी नाकेबंदी करीतअसताना दुसरीकडे सोनसाखळी चोरणाºया व घरफोड्या करणाºया गुन्हेगारांनी अशाप्रकारे उघडपणे लुटमारीचे प्रकार करून पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. राजीवनगर परिसरात वैभव कॉलनीतील कृष्णा पार्क अपार्टमेंटमध्ये गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास काळे कपडे परिधान केलेल्या एका अज्ञात चोरट्याने मीनाक्षी केसरकर यांचा दरवाजा ठोठावला. त्यांनी दरवाजा उघडला असता चोरट्यांनी त्यांना बाहेर खेचून सुºयाचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडण्याचा प्रयत्न केला; परंतु मीनाक्षी यांनी त्यांना प्रतिकार केला. या झटापटीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रासह १० ते १५ ग्रॅमची सुमारे ३५ हजार रुपये किमतीची अर्धी पोत तुटून चोरट्यांच्या हातात गेली. यावेळी मीनाक्षी यांनी आरडाओरडा केल्यामुळे शेजारी जमण्याच्या भीतीने चोरट्याने इमारतीच्या वरच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर शेजारील रहिवाशांनी चोरट्याचा शोध घेतला; परंतु तो सापडला नाही. दरम्यान, चोरट्याशी झालेल्या झटापटीत मीनाक्षी केसरकर यांच्या गळ्याला व डाव्या हाताला दुखापत झाल्यामुळे त्यांनी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा प्रकारांमध्ये चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना नेहमीच अपयश आल्याने चोरट्यांचे धाडस वाढले असून, आता थेट घराच्या दरवाजापर्यंत पोहोचून महिलांचे दागिने ओरबाडण्यापर्यंत चोरांची मजल पोहोचल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
चोरट्यांचे धाडस वाढले
नाशिक शहरातील विविध रस्त्यांवरून शतपावली करणाºया महिलांसोबत, सकाळी व्यायामासाठी घराबाहेर पडणाºया, शाळेत मुलांना सोडण्यासाठी जाणाºया पादचारी महिलांच्या अंगावरील दागिने दुचाकीवरून चोरण्याचे प्रकार यापूर्वी घडत होते. आता चोरट्यांचे धाडस वाढले आहे़

Web Title:  Arambadale woman's mangalsutra by knocking her door in Rajivnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.