येवला तालुक्यातीलअंगणगावी गुदाम बांधकामास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 05:15 PM2018-08-10T17:15:08+5:302018-08-10T17:15:54+5:30

नवीन इमारत : तीन हजार टन क्षमतेची नवीन इमारत

Approval of construction of godowns at Ananganagavi in ​​Yeola taluka | येवला तालुक्यातीलअंगणगावी गुदाम बांधकामास मंजुरी

येवला तालुक्यातीलअंगणगावी गुदाम बांधकामास मंजुरी

Next
ठळक मुद्देमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय मागण्यांमध्ये त्यांनी कपात सूचना देखील मांडली होती

येवला : तालुक्यातील अंगणगाव येथे नवीन ३ हजार टन क्षमतेच्या ६ कोटी ९३ लक्ष रु पये किंमतीच्या नवीन गुदाम इमारतीच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना कपात सूचनेवरील लेखी उत्तरात दिली आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात धान्याच्या पुरवठ्याची अधिक गरज आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पुरेशी साठवण क्षमता तयार करण्यासाठी येवला तालुक्यातील अंगणगाव येथे ३ हजार मेट्रिक टन क्षमतेचे गुदाम बांधण्याच्या संदर्भातील प्रस्तावास मान्यता देण्यात यावी यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. यासाठी सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय मागण्यांमध्ये त्यांनी कपात सूचना देखील मांडली होती. त्यानुसार, येवला तालुक्यातील अंगणगाव येथे नवीन ३ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन गुदाम इमारतीच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. परिणामी, अपुऱ्या गुदामामुळे होणारी अन्नधान्याची नासाडी थांबणार असून येवला तालुक्यातील नागरिकांना धान्य पुरवठा करण्यासाठी अधिक गुदामाची व्यवस्था होणार आहे.
गुदामे अपुरी
नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी येवला तालुक्यात उपलब्ध असलेली गुदामे कमी पडत होती. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी व जिल्हापुरवठा अधिकारी यांना येवला तालुक्यातील अंगणगाव येथे नवीन गोदाम होण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो शासनास पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या.

Web Title: Approval of construction of godowns at Ananganagavi in ​​Yeola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक