उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अ‍ॅप आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार : नूतन कार्यकारिणीने स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:24 AM2018-06-01T01:24:03+5:302018-06-01T01:24:03+5:30

सिडको : उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता आयमाच्या वतीने लवकरच नवीन अ‍ॅप सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आयमाचे नवनिर्वाचित अध्यक्ष वरुण तलवार यांनी दिली आहे.

App IMA Chairman Varun Talwar: In order to know the problems of entrepreneurs, the Nutan executive has accepted the charge. | उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अ‍ॅप आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार : नूतन कार्यकारिणीने स्वीकारला पदभार

उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अ‍ॅप आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार : नूतन कार्यकारिणीने स्वीकारला पदभार

Next
ठळक मुद्देउद्योजकांना नेहमी विविध समस्यांना सामोरे जावे लागतेलवकरच आयमा अ‍ॅप सुरू करणार

सिडको : उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता आयमाच्या वतीने लवकरच नवीन अ‍ॅप सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आयमाचे नवनिर्वाचित अध्यक्ष वरुण तलवार यांनी दिली आहे.
आयमाचे नूतन अध्यक्ष वरुण तलवार यांनी मावळते अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्याकडून सर्वसाधारण सभेत गुरुवारी (दि. ३१) पदभार स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर डी.जी. कुलकर्णी, निखिल पांचाळ, ललित बूब, राजेंद्र अहिरे, एस. एस. आनंद, योगीता अहेर आदी उपस्थित होते. यावेळी तलवार यांनी उद्योजकांना नेहमी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या तक्र ारींची सोडवणूक महापालिका, पोलीस विभाग तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे जाऊन सोडवाव्या लागतात. यामध्ये वेळेचा अपव्यय होतो. कामे अडून पडतात. याकरिता लवकरच आयमा अ‍ॅप सुरू करणार असल्याचे सांगितले. तसेच जाहीरनाम्यातील सर्व अडचणी दोन वर्षांच्या कालावधीत सोडविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी बोलताना सांगितले की, आयमाला येत्या काळात अनेक नवीन आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. कामगार युनियन जर कारखाना बंद पाडण्याची भाषा करत असतील तर उद्योजकांनीही एकत्र येऊन विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले. तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार तुषार चव्हाण यांनी यापुढे आयमाच्या सर्वच कामात आपण मदत करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी भविष्यात आयमा व चेंबर्स मिळून काम करण्याची तयारी दर्शविली. उद्योगभारतीचे अध्यक्ष जयंत महाजन यांनी आयमा संदर्भातील खटले सामंजस्याने मिटविण्याचे आवाहन करून सदस्यांना एसएमएस सुविधा सुरू करण्याची मागणी केली. यावेळी आयमाचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: App IMA Chairman Varun Talwar: In order to know the problems of entrepreneurs, the Nutan executive has accepted the charge.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.