रुग्णवाहिकेतून मद्यसाठा जप्त

By admin | Published: February 18, 2017 12:09 AM2017-02-18T00:09:52+5:302017-02-18T00:10:08+5:30

अवैध मद्य वाहतूक : एका संशयितास अटक

The ammunition seized from the ambulance | रुग्णवाहिकेतून मद्यसाठा जप्त

रुग्णवाहिकेतून मद्यसाठा जप्त

Next

नाशिक : महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आमिष दाखविण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठ्याची वाहतूक केली जाते आहे़ या पार्श्वभूमीवर दीव-दमन येथून एका रुग्णवाहिकेद्वारे शहरात येत असलेला दोन लाखांचा अवैध मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी (दि़१७) पहाटेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील इंदिरानगर बोगद्याजवळ पकडला़ या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे़  अहमदनगर येथील विषारी दारू बळीच्या पार्श्वभूमी तसेच महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दहा तपासणी नाक्यांद्वारे वाहनांची कडक तपासणी केली जात आहे़ उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील अधिकारी कर्मचारी शहर व जिल्ह्यात गस्त घालीत आहेत़ गुरुवारी (दि.१६) भरारी पथकाद्वारे शहरातील आडगाव, घोटी, त्र्यंबकेश्वर, औरंगाबादरोड, दिंडोरीरोड, पेठरोड, दुगाव या मार्गांवर तपासणी नाके उभे करून वाहनांची तपासणी केली गेली़  या तपासणीदरम्यान इंदिरानगर बोगद्याजवळ उभ्या असलेल्या पथकास एक संशयास्पद रुग्णवाहिका(एमएच १५, ईएफ ७२२) आढळली. त्यांनी चालकाची कसून तपासणी केली असता त्यामध्ये दिव - दमण येथील महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेले विदेशी मद्याचे २६ बॉक्स आढळून आले. या प्रकरणी वाहनचालक अमिताभ शार्दूल यास अटक करण्यात आली असून, त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मनोज चव्हाण, वाय. आर. सावखेडकर, राजेंद्र धनवटे, उत्तम आव्हाड, कैलास कसबे, गणेश शेवगे यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)

Web Title: The ammunition seized from the ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.