खेडगाव येथे २४ मे रोजी कृषी कवी संमेलन

By admin | Published: May 21, 2017 12:57 AM2017-05-21T00:57:46+5:302017-05-21T00:57:58+5:30

खेडगाव येथे २४ मे रोजी कृषी कवी संमेलन

Agricultural Poetry Conference on 24th May at Khedgaon | खेडगाव येथे २४ मे रोजी कृषी कवी संमेलन

खेडगाव येथे २४ मे रोजी कृषी कवी संमेलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : गेल्या तीन वर्षात विविध संकटांमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. यामुळे राज्यात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शेतकरी संकटात आहे. हे सत्यच, पण आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही, तर संकटांना सामोरा जाण्याची मानिसकता वाढवयास हवी. या विचारांची जागृती कवितेच्या माध्यमातून नामवंत कवी रामदास फुटाणे हे विविध ठिकाणी कार्यक्र म घेऊन करणार आहेत. या वैशीट्य पूर्ण कार्यक्र माचा प्रारंभ दिंडोरी तालुक्यातील खेडगांव येथुन बुधवार दिनांक २४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक खेडगावचे उपसरपंच दत्तात्रय पाटील व निमंत्रक कवी प्रा.संदीप जगताप यांनी दिली.
या कृषी कवीं संमेलनात प्रसिद्द कवी रामदास फुटाणे हे सूत्रसंचालन करणार असून या वेळी संभाजी भगत (मुंबई), अशोक नायगावकर (मुंबई), सुरेश शिंदे (करमाळा), महेश केळुस्कर (मुंबई), संदीप जगताप (चिंचखेड), दुर्गेश सोनार (पंढरपूर), नितीन देशमुख (अमरावती), भरत दौंडकर (शिरूर), अरु ण मात्रे (मुंबई), प्रा. लक्ष्मण महाडिक (पिंपळगांव बसवंत) प्रकाश होळकर (लासलगाव), अनिल दीक्षीत( पुणे), नारायण पुरी (नांदेड), साहेबराव ठाणगे (पारनेर), प्रशांत केंदळे (नाशिक), तुकाराम धांडे (इगतपुरी), अरु ण पवार (बीड), रविंद्र कांगणे ( सिन्नर) आदि कवी सहभागी होणार आहे. या कवी संमेलनास शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान खेडगांव ग्रामपालिका व संयोजक समस्त खेडगाव ग्रामस्थांनी केले आहे .

Web Title: Agricultural Poetry Conference on 24th May at Khedgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.