लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:46 AM2018-09-11T01:46:46+5:302018-09-11T01:47:08+5:30

ममदापूर गावालगतच्या बंधाऱ्यातील आडवे बोअर बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरु वात केली होती. प्रांताधिकाºयांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

 After the written assurance, the hunger strike of the villagers | लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांचे उपोषण मागे

लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांचे उपोषण मागे

Next

येवला : ममदापूर गावालगतच्या बंधाऱ्यातील आडवे बोअर बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी येथील तहसील कार्यालया समोर उपोषणाला सुरु वात केली होती. प्रांताधिकाºयांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.  ममदापूर गावाशेजारी बंधारा असून सदर बंधारा १९७२च्या दुष्काळात तयार करण्यात आला आहे. सदर बंधाºयालगतच्या क्षेत्रात पाच शेतकºयांनी चार विहिरी खोदून त्या विहिरीत सहा इंच जाडीचे एक दोन नाही तर तब्बल पंचवीस आडवे बोर घेतल्याने बंधाºयातील पाणी विहिरीत जाते. ते पाणी सहा ते सात शेतकरी विद्युत पंपाच्या साह्याने शेतीसाठी वापरतात. यावर्षी जेमतेम पाऊस झाल्यामुळे बंधाºयात थोडे पाणी आले ते पाणीदेखील संबंधित शेतकºयांच्या तळ्यात व मळ्यात जाते. त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महिनाभरातच बिकट होऊ शकतो. या बंधाºयालगत गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायत मालकीची विहिरी आहे. परिसरात कुठल्याही पाटाचे किंवा पाटचारीचे पाणी येत नाही तसेच ३८ गाव पाणीपुरवठा योजना या भागात नाही. हे पाणी उपसा बंद झाले तर गावातील लोकांना उन्हाळ्यात टॅँकरची गरज भासणार आहे. ममदापूर हा परिसर कायमचा दुष्काळी असून, पिण्याच्या पाण्यासाठी या भागात टॅँकरवर अवलंबून रहावे लागते. टॅँकर वेळेवर मिळत नाही त्यामुळे ग्रामस्थांनी गावाचे पाणी राखीव ठेण्यासाठी वेळोवेळी अर्ज दिले; परंतु शासनाने कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे ममदापूर येथील दत्तू वाघ, अशोक वाघ, सुभाष गोराणे, चंद्रकात वाघ, तुळशीराम गुडघे, मच्छिंद्र गुडघे यांच्यासह ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. याबाबत सायंकाळी गटविकास सुनील अहिरे यांनी ग्रामसेवकाला दिलेले कारवाईचे व बोअर बंद करण्याचे पत्र प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते वाघ व त्यांच्या सहकाºयांना देण्यात आले. त्यावर समाधान झाल्याने त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.

Web Title:  After the written assurance, the hunger strike of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.