नाशकात मतभेदांनंतर सुकाणू सदस्यांच्या राज्यव्यापी बैठकीला सुरुवात, नव्याने राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 01:06 PM2018-01-01T13:06:22+5:302018-01-01T13:17:29+5:30

शेतकरी संपाचे केंद्र बनलेल्या नाशिक शहरातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात एल्गार पुकारण्याची तयारी सुरू झाली असून, शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सुकाणू समितीची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये शासकीय विश्रमगृहात बैठक सुरू

After the differences in Nashik, the state-wide meeting of the steering members will start, the direction of the new statewide agitation. | नाशकात मतभेदांनंतर सुकाणू सदस्यांच्या राज्यव्यापी बैठकीला सुरुवात, नव्याने राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरणार

नाशकात मतभेदांनंतर सुकाणू सदस्यांच्या राज्यव्यापी बैठकीला सुरुवात, नव्याने राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरणार

Next
ठळक मुद्देसुकाणू समिती सदस्यांच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात काही सदस्यांकडून यापूर्वीच समितीच्या विसर्जनाची घोषणामतभेदानंतर उर्वरित गटांची एकत्रित बैठक

नाशिक : सुकाणू समितीच्या माध्यमातून शेतकरी संपाचे केंद्र बनलेल्या नाशिक शहरातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात एल्गार पुकारण्याची तयारी सुरू झाली असून, शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सुकाणू समितीची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये शासकीय विश्रमगृहात बैठक सुरू झाली झाली आहे.
नाशिकमधील काही सूकाणू सदस्यांनी ही समिती विसर्जित करण्याची घोषणा केली होती. तसेत एका गटाने अशोका मार्ग येथे तर दुस:या गटाने शासकीय विश्रम गृहात बैठक बोलावली होती. परंतु समिती विसर्जित करण्याच्या घोषणोनंतर उर्वरित दोन गट एकत्र आले असून या दोन्ही गटांतील सूकाणू समितीच्या सदस्यांनी शासकीय विश्रमगृहात बैठक सुरू केली असून या बैठकीत शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. शेतक:यांच्या क जर्मुक्तीसाठी नाशिकमधून सुकाणू समितीच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या लढय़ाच्या दुस:या टप्प्यात राज्यव्यापी जनजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते; परंतु सरकारने हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्यांवर तसेच कोणत्याच धोरणात्मक विषयावर चर्चा घडवून न आणता शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सुकाणू समितीतील सदस्यांनी केला असून, सरकारविरोधात शेतक:यांचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्णय या सदस्यांनी घेतला आहे. या शेतकरी आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सुरुवातही नाशिकमधूनच होणार असल्याने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष नाशिक येथील बैठकीकडे लागले आहे. सुकाणू समितीच्या या बैठकीत पुढील आंदोलनाची रणनीती ठरविण्यासह या आंदोलनाचे स्वरूप कसे असावे या विषयावरही चर्चा होत आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची वारंवार उपेक्षा होत असल्याने पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन करून चक्का जाम करण्याचा शेतकऱ्यांचा विचार असून राज्यातील बाजारपेठांसोबतच राज्याबाहेरून महाराष्ट्रात येणारा भाजीपाल्याचा पुरवठाही खंडित करण्याच्या दृष्टीने आंदोलनाची तयारी करावी, असा मतप्रवाह शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे. परंतु, राज्यभरात शेतकऱ्यांनी केलेली आंदोलने व त्यांचा सरकारवर झालेला परिणाम याचा सविस्तर विचार करून 1 जानेवारीच्या राज्यस्तरीय बैठकीत चर्चा होत असून पुढील आंदोलनाची दिशाही या बैठकीत ठरविली जाणार आहे.

Web Title: After the differences in Nashik, the state-wide meeting of the steering members will start, the direction of the new statewide agitation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.