थंडीचा रब्बी पिकांना फायदाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:50 PM2019-01-01T12:50:04+5:302019-01-01T12:50:13+5:30

येवला : गेल्या पंधरा दिवसांपासून पडणा-या थंडीचा रब्बी पिकांना फायदाच होणार आहे. दोन महिन्यांपासून येवला तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम ...

The advantage of the winter rabbit crops! | थंडीचा रब्बी पिकांना फायदाच !

थंडीचा रब्बी पिकांना फायदाच !

Next

येवला : गेल्या पंधरा दिवसांपासून पडणा-या थंडीचा रब्बी पिकांना फायदाच होणार आहे. दोन महिन्यांपासून येवला तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागात दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत. यंदा तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस पडला असला तरी धरण क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे पालखेड डावा कालव्यातून येवल्याच्या पूर्व भागात आठ दिवसांपूर्वी या आवर्तनातून मिळालेल्या पाण्यामुळे शेतकरी काहीसा सुखावला आहे.सध्या नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारे जरी नसले तरी मोठ्या प्रमाणात कांद्याची नव्याने लागवड शेतकर्यांनी केली आहे.तालुक्यातील पूर्व भागातील कोटमगाव येथील शेतकरी राजेंद्र कोटमे यांनी आपल्या शेतात सव्वा एकर उन्हाळ कांद्याची लागवड केली आहे. पालखेड आवर्तनामुळे येथील शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळाला असून शेतातील रब्बी हंगामातील पिकांना या पाण्यामुळे जीवदान मिळणार आहे.परंतु हे पाणी किती दिवस टिकेल याची खात्री नसल्याने आत्तापासूनच शेतकरी कांद्याला ड्रीप चा आधार देत पाण्याची बचत होईल याची काळजी शेतकरी घेत आहेत. मागील तीन दिवसांपासून पडणाºया कडाक्याच्या थंडी मुळे कांदा हरभरे, गहू हिरवी गार झाली आहे.तर द्राक्ष उत्पादक मोठ्या संकटात सापडला दिसल्याचे दिसून येत आहे. मागील दोन मिहन्यांपासून जिल्हा भरात कांद्याचे दर एकदम नीचांकी दरावर येऊन पोहचले असून येवला तालुक्यासह जिल्हा भरात कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

Web Title: The advantage of the winter rabbit crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक