अतिक्रमण विभागाची कारवाई; एक ट्रक साहित्य जप्त

By Suyog.joshi | Published: February 2, 2024 10:22 PM2024-02-02T22:22:23+5:302024-02-02T22:22:31+5:30

शहरातील विविध भागात महपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली.

Action by Encroachment Department; | अतिक्रमण विभागाची कारवाई; एक ट्रक साहित्य जप्त

अतिक्रमण विभागाची कारवाई; एक ट्रक साहित्य जप्त

नाशिक (सुयोग जोशी) : शहरातील विविध भागात महपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली. मनपा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त नितीन नेर यांच्या आदेशानुसार पश्चिम विभागीय अधिकारी योगेश रकटे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार कारंजा ते बोरपट्टी व फूल बाजार ते दही फूल तसेच मेन रोड ते शालीमारपर्यंत दुकानधारकांवर व हातगाड्या चालकांवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली.

अतिक्रमित कपडे, खुर्च्या, टेबल, स्टॅन्ड बोर्ड व इतर साहित्य असा एकूण एक ट्रक साहित्य जप्त करून मनपाच्या आडगाव गोदामात जमा करण्यात आले. प्रवीण बागुल, नीलेश काळे, रमेश शिंदे, जावेद शेख, सुनील कदम, मेहुल दवे, मेघनाथ तिडके, जगन्नाथ हमारे आदी मनपा सेवकांनी कारवाई केली. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त होता. गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण विभागातर्फे शहरात ही मोहीम राबविण्यात येत आहे.

Web Title: Action by Encroachment Department;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.