हुंडाबळी प्रकरणातील आरोपी पतीस दहा वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 01:37 AM2020-11-28T01:37:11+5:302020-11-28T01:37:31+5:30

नाशिक : टाकळी परिसरातील समतानगर येथे हुंड्यासाठी पत्नीला मारहाण करून तिला भितीवर ढकलून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

The accused in the dowry case was sentenced to 35 years rigorous imprisonment | हुंडाबळी प्रकरणातील आरोपी पतीस दहा वर्षांचा सश्रम कारावास

हुंडाबळी प्रकरणातील आरोपी पतीस दहा वर्षांचा सश्रम कारावास

Next

नाशिकटाकळी परिसरातील समतानगर येथे हुंड्यासाठी पत्नीला मारहाण करून तिला भितीवर ढकलून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

टाकळी परिसरातील समतानगर भागात २५ मे २०१६ रोजी आरोपी विक्रम अर्जून पवार याने याने त्याची पत्नी सोनावी विक्रम पवार हिला माहेरून हुंडा आणला नाही म्हणून लाथा बुक्यांनी मारहाण करून भिंतीवर ढकलून दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात आरोपी विक्रम पवार याच्याविरोेधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम. व्ही. शिंदे यांनी सखोल तपास करून आरोपीविरोधात सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या साक्षी पुराव्यांच्या आधारे जिल्हा सत्र न्यायालयाील न्यायाधीश एस. एस. नायर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरोपीला दहा वर्षांचा सश्रम कारावास तसेच तीन वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Web Title: The accused in the dowry case was sentenced to 35 years rigorous imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.