जिल्ह्यात संपामुळे प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:36 AM2017-10-18T00:36:12+5:302017-10-18T00:36:17+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांना सातवा वेतन लागू करावा या प्रमुख मागणीसाठी एसटी चालक आणि वाहकांनी ऐन दिवाळीत पुकारलेल्या बेमुदत संपाचा ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फटका बसला. संपाचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी भाड्यात तिप्पट वाढ केली.

The accident occurred due to a strike in the district | जिल्ह्यात संपामुळे प्रवाशांचे हाल

जिल्ह्यात संपामुळे प्रवाशांचे हाल

Next

सटाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांना सातवा वेतन लागू करावा या प्रमुख मागणीसाठी एसटी चालक आणि वाहकांनी ऐन दिवाळीत पुकारलेल्या बेमुदत संपाचा ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फटका बसला. संपाचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी भाड्यात तिप्पट वाढ केली.  संपामुळे सटाणा स्थानकात शुकशुकाट होता. मंगळवारच्या मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे प्रवासांचे प्रचंड हाल झाले, तर बाहेरगावाहून येणाºया-जाणाºया प्रवाशांना संपामुळे संबंधित आगारात ताटकळत राहावे लागले. दिवाळी सण साजरा करण्यासाठी आपापल्या गावी जाणाºयांना आल्या पावली माघारी परतावे लागले. दिवाळी सणात मोठ्या प्रमाणात एसटीने प्रवास होतो. आदिवासी व दुर्गम भागातील खेडोपाडी पोहचणाºया एसटीला प्रवाशांची पहिली पसंती असते. तसेच एसटीचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर असल्याने प्रवासी एसटीनेच ये-जा करतात. मात्र दिवाळी सणाच्या तोंडावरच एसटी कर्मचाºयांनी संप पुकारल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे. एसटी कर्मचाºयांना सेवाज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्या वतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेदमुत संपाचे हत्यार उपसण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून सातवा वेतन आयोग लागू करावा व इतर विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी कर्मचारी पाठपुरावा करत होते; परंतु राज्य सरकारने कुठलीही दखल न घेतल्यामुळे परिवहन मंडळाच्या कर्मचाºयांनी अखेर राज्यभर संप करण्याचा निर्णय घेतला व या संपाला सर्व संघटनांनी पाठिंबा दिला. या संपात सटाणा आगाराचे तब्बल साडेतीनशे कर्मचारी सहभागी झाले होते. हरिभाऊ रौंदळ, किशोर सोनवणे, सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शना-खाली कर्मचाºयांनी ठिय्या दिला होता.
देवळ्यात प्रवाशांकडून दुप्पटीने भाडेवसुली
देवळा : ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसला असून, एसटी भाड्यापेक्षा दुप्पट पैसे मोजून खासगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ आली आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनचालकांनी प्रवाशांची अडवणूक करत अव्वाच्या सव्वाभाडे वसूल केल्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे प्रवासी मात्र हवालदिल झाले होते. नुकत्याच शाळा, महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या असून, नाशिक, पुणा, मुंबई आदी शहरात शिक्षणासाठी राहणारे विद्यार्थी तसेच नोकरीनिमित्ताने शहरात राहणारे चाकरमाने आता गावाकडे परतू लागले आहेत.
 या सर्वांनाच एसटीचा प्रवास आर्थिकदृष्ट्या  सोईस्कर ठरतो. एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी सेवा संपूर्ण बंद होती. यामुळे शहरातून गावाकडे परतणाºया सर्वांचेच हाल झाले. या संपाचा फायदा घेऊन खासगी वाहनचालकांनी प्रवासी भाडे जवळपास दुप्पट - तिप्पट केले. संपामुळे गावाकडे सुट्टीसाठी परतणाºयांना खासगी वाहनांचा आधार घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. नाशिक ते देवळा एसटी भाडे ८१ रुपये आहे; परंतु संपामुळे प्रवाशांना नाशिकहून देवळा येथे येण्यासाठी सकाळी १४० रुपये मोजावे लागत होते. दुपारनंतर हा दर ३०० रु पये  झाला होता.
अनेक प्रवासी परतले घरी
दिवाळी साजरी करण्यासाठी गावाकडे जाणाºया चाकरमान्यांची, विद्यार्थ्यांची प्रत्येक स्थानकात गर्दी पहावयास मिळाली; संप असल्याने एकही बसस्थानकात आली नाही. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. खासगी वाहतूकदारांनी संपाचा फायदा घेत प्रवाशांची आर्थिक लूट करण्यात सुरू केली. काही प्रवाशांनी नाइलाजास्तव खासगी वाहनांतून प्रवास केला. काही प्रवासी लहान मुलांना घेऊन देवदर्शनासाठी बाहेर पडले होते. परंतु मध्यरात्री सुरू झालेल्या संपाची कुठलीही माहिती नसल्यामुळे त्यांना स्थानकातून घराची वाट धरावी लागली.

Web Title: The accident occurred due to a strike in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.