अभियांत्रिकीमुळेच देशाच्या विकासाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:15 AM2017-07-26T00:15:39+5:302017-07-26T00:16:09+5:30

नाशिक : संघवी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने ‘रिसेंट ट्रेंड्स इन पावर जनरेशन इन पावर क्वालिटी’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

abhaiyaantaraikaimaulaeca-daesaacayaa-vaikaasaalaa-caalanaa | अभियांत्रिकीमुळेच देशाच्या विकासाला चालना

अभियांत्रिकीमुळेच देशाच्या विकासाला चालना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महावीर एज्युकेशन सोसायटीच्या संघवी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने ‘रिसेंट ट्रेंड्स इन पावर जनरेशन इन पावर क्वालिटी’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे निवृत्त मुख्य अभियंते सुरेश भांडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, कुठल्याही देशाची सर्वांगीण प्रगती ही अभियांत्रिकीवर अवलंबून असते. देशातील वाहतूक व्यवस्था, उत्पादन प्रक्रिया, विद्युत निर्मिती आणि वितरण, बांधकाम, यंत्रे, दूरसंचार, वैद्यकीय, प्रसारमाध्यमे, शेती, अवकाश यामध्ये विकास हा अभियांत्रिकीमुळेच घडून आलेला आहे. विद्युत निर्मिती आणि वितरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी असून, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. विद्युत वितरण विभागात विद्युत वितरण यंत्रणा कशी चालते, विद्युत नियंत्रण कसे केले जाते, विद्युत निर्मिती प्रकल्पाचे कामकाज कसे चालते यावरील सखोल माहिती त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली.यावेळी विभागप्रमुख नागोराव पवार, प्रा. सुनील चव्हाण, प्रा. राजेंद्र पूरकर, प्रा. सचिन जाधव, प्रा. राहुल बनकर, शिवम मांडलिक, राहुल मिंडे, सचिन जाधव, प्रा. सुनील चव्हाण आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नम्र जोशी यांनी केले.

Web Title: abhaiyaantaraikaimaulaeca-daesaacayaa-vaikaasaalaa-caalanaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.