येवल्यात गोमांस भरलेले वाहन पेटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2022 01:26 AM2022-04-09T01:26:14+5:302022-04-09T01:26:37+5:30

येवला येथील फत्तेबुरूज नाक्यावर शुक्रवारी (दि.८) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गोमांसने भरलेले पिकअप वाहन नागरिकांनी पेटून दिल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

A vehicle full of beef was set on fire in Yeola | येवल्यात गोमांस भरलेले वाहन पेटवले

येवला येथे नागरिकांनी पेटवून दिलेले पिकअप वाहन.

Next

येवला : येथील फत्तेबुरूज नाक्यावर शुक्रवारी (दि.८) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गोमांसने भरलेले पिकअप वाहन नागरिकांनी पेटून दिल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला शहरातील फत्तेबुरूज नाक्यावर मनमाड रस्त्यावरून कोपरगावच्या दिशेने जाणारे एक पिकअप वाहन (क्रमांक एमएच ०६ एजी ३४३१) मागील चाकाचे एक्सेल तुटल्याने थांबवण्यात आले होते. दरम्यान, वाहनातील उग्र वासामुळे आसपासच्या नागरिकांना या पिकअप वाहनाबाबत संशय आला. त्यांनी शहनिशा केली असता या पिकअपमध्ये गोमांस असल्याचे आढळून आले. यावेळी संतप्त नागरिकांनी पिकअप वाहन पेटवून दिले. यावेळी गर्दीचा फायदा घेत चालक पसार झालेला होता. ही घटना समजताच येवला पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी पोलीस कर्मचारी पाठवून अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. पोलिसांनी चालकाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

Web Title: A vehicle full of beef was set on fire in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.