विवाहितेच्या छळ प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

By Admin | Published: December 12, 2015 11:53 PM2015-12-12T23:53:15+5:302015-12-12T23:53:42+5:30

विवाहितेच्या छळ प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

9 accused in marriage case | विवाहितेच्या छळ प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

विवाहितेच्या छळ प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

googlenewsNext

मालेगाव : येथील संगमेश्वरातील विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी
जुबेर शा कलीम शा सह सासरच्या नऊ जणांविरोधात (सर्व रा. बाग-ए- महेमूद, संगमेश्वर) छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडित २० वर्षीय विवाहितेने पोलिसांत तक्रार दिली आहे की, माहेरून घर बांधण्यासाठी दीड लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. तिच्या अंगावरील दागदागिने काढून घेऊन घराबाहेर हाकलून दिले. तपास उपनिरीक्षक डी. एस. कांबळे करीत आहेत.
मुलीस फूस लावून
पळविणाऱ्यास अटक
पिंपळगाव बसवंत : येथून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या मुलीचा काही तासात पोलिसांनी छडा लावून आरोपीस जेरबंद केले.
पिंपळगाव बसवंत येथून एका २३ वर्षीय मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या किरण गांगुर्डे (२४) रा. उंबखेड यास पोलिसांनी अटक केली. मुलींना फूस लावून नेण्याचा त्याचा नित्याचाच उपक्रम होता. मुलीने दिलेल्या फिर्यादीत लग्नाचे आमिष दाखविण्यात आल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी सापळा रचून आरोपीस दुसऱ्या दिवशी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, पो. कॉ. मुंडे, पो. कॉ. गिते पुढील तपास करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: 9 accused in marriage case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.