लॉन्समध्ये ५० हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:43 AM2019-04-24T00:43:32+5:302019-04-24T00:44:19+5:30

गंगापूररोडवरील सोमेश्वर लॉन्समधील वधू कक्षात बॅगमध्ये ठेवलेले २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेची फिर्याद गंगापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, अज्ञात चोरट्याविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 50 thousand stolen in the lawns | लॉन्समध्ये ५० हजारांची चोरी

लॉन्समध्ये ५० हजारांची चोरी

Next

गंगापूर : गंगापूररोडवरील सोमेश्वर लॉन्समधील वधू कक्षात बॅगमध्ये ठेवलेले २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेची फिर्याद गंगापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, अज्ञात चोरट्याविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिभा शिंदे (५३, रा. तारवालानगर) या गंगापूर रोडवरील सोमेश्वर लॉन्स येथे लग्न सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. त्यादरम्यान त्यांनी लॉन्समधील वधू कक्षात बॅग ठेवली होती. सदर बॅगेत ५० हजार रु पये किमतीचे सुमारे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट होते. अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून बॅगेतील सदर ब्रेसलेट चोरून नेले. प्रतिभा शिंदे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गंगापूर रोडवरील असलेल्या या मोठमोठ्या लॉन्समध्ये चोरट्यांचा शिरकाव वाढल्याने उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या या लॉन्स व मंगल कार्यालयेही सुरक्षित नसल्याने बुकिंगसाठी लाखो रु पयांचा खर्च वाया जाऊन असुरक्षित असल्याचेच नागरिकांमध्ये चर्चा आहे. याबाबत लॉन्सचे संचालक सुरज आहेर यांना विचारले असता लॉन्समध्ये कुठल्याही प्रकारची चोरी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
वाहनांच्या बॅट-या लंपास
चेहेडी बुद्रुक येथून अज्ञात चोरट्याने तीन चारचाकी गाड्यांच्या बॅटºया चोरून नेल्या. चेहेडी बुद्रुक येथील सुनील संतू सातपुते यांच्या घराजवळ लावलेला ट्रॅक्टर (एमएच १५, बीडब्ल्यू १३६१), बोलेरो जीप व अशोक आवारे यांची मारुती व्हॅन गाडीची बॅटरी शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
मुलीचे अपहरण
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आलेल्या सातपूर येथील मुलीचे एका व्यक्तीने अपहरण केले आहे. सातपूर प्रबुद्धनगर येथील ज्योती सुधाकर गांगुर्डे या मुलीसह गुजरातहून नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल्वेने उतरल्या. त्यानंतर एका व्यक्तीने ज्योती गांगुर्डे यांच्या मुलीचे अपहरण करून पळवून नेले.
पेठरोडला युवकाची सोनसाखळी हिसकावली
पंचवटी येथील युवकाला मारहाण सुरू असताना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाºया युवकाला किरकोळ कारणावरून दोघा संशयितांनी बेदम मारहाण करत त्याच्या गळ्यातील सव्वादोन तोळे वजनाची सोनसाखळी जबरीने हिसकावून पलायन केल्याची घटना सोमवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याबाबत सुनील शंकरराव ढाकणे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. दत्तनगर परिसरात राहणारे संशयित आरोपी आकाश काळे व अजित कापसे असे दोघेजण एका मुलाशी भांडण करत असताना फिर्यादी त्या ठिकाणी गेले व त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांना राग आल्याने त्यांनी दगड, विटांनी फिर्यादीला मारहाण केली तसेच त्यांच्या गळ्यातील सव्वादोन तोळे वजनाची सोनसाखळी जबरीने चोरून नेली. त्यानंतर संशयितांनी कार मधून पलायन केले.

Web Title:  50 thousand stolen in the lawns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.