नाशिक विभागात ४१ हजार दिव्यांग मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 01:25 AM2019-03-20T01:25:29+5:302019-03-20T01:25:43+5:30

नाशिक विभागात सुमारे ४१ हजारांहून अधिक दिव्यांग मतदार असून, प्रत्येक दिव्यांग मतदाराला मतदानाचा अधिकार निर्भिड व सुलभपणे बजावण्यासाठी नोडल अधिकारी यांनी नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा दिव्यांग मतदार सुविधा निरीक्षक राजाराम माने यांनी दिल्या.

41 thousand Divyan voters in Nashik division | नाशिक विभागात ४१ हजार दिव्यांग मतदार

नाशिक विभागात ४१ हजार दिव्यांग मतदार

Next
ठळक मुद्देमतदानासाठी सोयी देण्याच्या माने यांच्या सूचना

नाशिक : नाशिक विभागात सुमारे ४१ हजारांहून अधिक दिव्यांग मतदार असून, प्रत्येक दिव्यांग मतदाराला मतदानाचा अधिकार निर्भिड व सुलभपणे बजावण्यासाठी नोडल अधिकारी यांनी नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा दिव्यांग मतदार सुविधा निरीक्षक राजाराम माने यांनी दिल्या.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक विभागीय आयुक्त यांची ‘दिव्यांग मतदार सुविधा निरीक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी नाशिक विभागातील निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, आपल्या जिल्ह्णातील मतदारसंघनिहाय दिव्यांगांची यादी तयार करून प्रत्येक मतदान केंद्रावरील दिव्यांगांची संख्या निश्चित करण्यात यावी. प्रत्येक दिव्यांग मतदाराला मतदान केंद्रापर्यंत जाणे शक्य होण्यासाठी मतदान केंद्राचे ठिकाणापर्यंत वाहतूक व्यवस्था करण्यात यावी, त्याचप्रमाणे ज्या मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदार आहेत ते मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्याचे नियोजन करावे. एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी सर्व यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे निर्देशही विभागीय आयुक्त माने यांनी दिले. यावेळी उपायुक्त रघुनाथ गावडे, सहायक आयुक्त उन्मेश महाजन, नाशिक मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.राहुल गायकवाड, समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ. नीलेश पाटील, राकेश महाजन, योगेश पाटील, पांडुरंग वाबळे, नितीन उबाळे, भारत धिवरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे आदी उपस्थित होते.
नाशिक विभागात ४१ हजार ६७२ दिव्यांग मतदार असून, त्यात नाशिक ९ हजार ६८४, धुळे ४ हजार ३९९, जळगाव १३ हजार ९१६, अहमदनगर ११ हजार १४२, नंदुरबार २ हजार ५३१ दिव्यांग मतदार आहेत. यावेळी नाशिक विभागातील जिल्हानिहाय दिव्यांग मतदारांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

Web Title: 41 thousand Divyan voters in Nashik division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.