४० जखमी : मृतांत एका बालकाचा समावेश; वालदेवी पुलाजवळील घटना वºहाडाचा टेम्पो उलटून दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:47 AM2017-12-20T01:47:24+5:302017-12-20T01:48:07+5:30

पाथर्डी फाटा येथून लग्नाचे वºहाड घेऊन घोटीकडे जाणारा भरधाव टेम्पो मुंबई-आग्रा महामार्गावर वालदेवी नदी पुलाजवळ उलटल्याची घटना मंगळवारी (दि़ १९) सकाळी घडली़

40 injured: One child involved in death; The incident near the Valdevi bridge and the blast of the tempo of two people killed | ४० जखमी : मृतांत एका बालकाचा समावेश; वालदेवी पुलाजवळील घटना वºहाडाचा टेम्पो उलटून दोन ठार

४० जखमी : मृतांत एका बालकाचा समावेश; वालदेवी पुलाजवळील घटना वºहाडाचा टेम्पो उलटून दोन ठार

Next
ठळक मुद्देजखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार रस्त्यावर सर्वत्र रक्त पडलेले

नांदूरवैद्य/नाशिक : पाथर्डी फाटा येथून लग्नाचे वºहाड घेऊन घोटीकडे जाणारा भरधाव टेम्पो मुंबई-आग्रा महामार्गावर वालदेवी नदी पुलाजवळ उलटल्याची घटना मंगळवारी (दि़ १९) सकाळी घडली़ या अपघातात कार्तिक दीपक माळी (रा. नायगाव) हा पाच वर्षीय मुलगा व चालकाशेजारी बसलेला गोपाळ रमेश पवार (४०, रा. पाथर्डी गाव, नाशिक) हे दोघे जागीच ठार झाले, तर टेम्पोतील चाळीस वºहाडी जखमी झाले आहेत. या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, टेम्पोचालकाविरोधात वाडीवºहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी गावातील काळू किसन माळी यांच्या मुलाचा मंगळवारी अस्वली स्टेशनजवळ असलेल्या नांदगाव येथे विवाह सोहळा होता. या विवाहासाठी पाथर्डी गावातून सुमारे ५५ वºहाडी ४०७ टेम्पोने (एमएच १५, डीके २०९०) जात होते़ मुंबई-आग्रा महामार्गावरून घोटीच्या दिशेने जात असलेला हा टेम्पो सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास वाडीवºहेजवळील वालदेवी नदीवरील पुलाच्या अलीकडे उतारावरून चढाच्या दिशेने जात असताना, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हुंडाई मोटारच्या गुदामासमोरच उलटला व सुमारे तीस फूट घसरत गेला़ नायगाव येथील कार्तिक माळी हा चिमुरडा अपघातात जागीच ठार झाला, तर चालकाशेजारी बसलेले पाथर्डी गावातील गोपाळ पवार यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ टेम्पोत बेसावध बसलेले वºहाडी एकमेकांच्या अंगावर पडल्याने जखमी झाले. रस्त्यावर सर्वत्र रक्त पडलेले होते़ वाडीवºहे पोलीस ठाण्यास अपघाताची माहिती कळताच ते घटनास्थळी पोहोचले व १०८ रुग्णवाहिकेस माहिती दिली़ त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ टेम्पोतील वºहाडींमध्ये लहान मुले, महिला यांची संख्या अधिक होती़ या अपघातातील पाच जणांची प्रकृती गंभीर असून, त्यामध्ये टेम्पो चालकाचाही समावेश आहे़ दरम्यान, अपघाताची माहिती कळताच आरोग्य उपसंचालक एल. घोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांनी सर्व तयारी केली होती़ तसेच जखमींवरील उपचारासाठी चार शल्यचिकित्सक, तीन अस्थिरोगतज्ज्ञ, सहा परिचारिका, पंधरा प्रशिक्षणार्थी परिचारिका उपस्थित होते़
अपघातातील जखमी
सोनाली शिवाजी वाघमारे (२५), धोंडाबाई पुंडलिक भोई (५०), विमलाबाई गायकवाड (५०), हरि किसन गांगुर्डे (४५), अशोक छबू पवार (४५), गीता बाबुराव हांडगे (१७), विमल हरी गायकवाड (४५), राजश्री रामदास पवार (१०), सुमन रंगनाथ गायकवाड (५६), चांगूबाई हांडगे (३५), पूजा मधुकर गुंजाळ (१५), ज्ञानेश्वर हांडगे (१५), संतोष केशव गुंजाळ (१८), अनिता पवार (४०), हौसाबाई यशवंत गुंजाळ (४०), साहेबराव गुलाब पवार (२४), अमोल राजाराम पवार (१२), छाया मधुकर गुंजाळ (२५), सुमनबाई माळी (३७), राणीबाई बाळू जाधव (२८), सुंदराबाई गोधडे (६५), चांगुलाबाई बाबुराव हांडगे (३५), ईश्वरी दीपक माळी (साडेतीन महिने), दीपाली दीपक माळी (२८), द्रौपदा नंदू पिंपळे (४०), रोहित अशोक पवार (१४), आबा देवराम शेलार (५५), काळू किसन माळी (५५), आशा संजय बडे (२७), रोहिणी पवार (१४), सगुणा बाबुराव बर्डे (६०), विजय मधुकर गुंजाळ (१८), सागर सुका बेंडकुळे (२२), भाग्यश्री संजय बडे (५४), वैष्णवी संजय बडे (५४), पुष्पा जाधव (४४), रुपा पिंपळे (२५), सिंधू राजाराम पवार (५६), यमुनाबाई भाऊसाहेब घाडगे (५०), हौसाबाई पवार (३०), काळूबाई गुंजाळ (४०).

Web Title: 40 injured: One child involved in death; The incident near the Valdevi bridge and the blast of the tempo of two people killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात