समाज कल्याणच्या ४० कोटींच्या अडकल्या योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 07:55 PM2017-09-15T19:55:42+5:302017-09-15T19:55:48+5:30

40 crores of social welfare schemes | समाज कल्याणच्या ४० कोटींच्या अडकल्या योजना

समाज कल्याणच्या ४० कोटींच्या अडकल्या योजना

Next


नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सन २०१६-१७ च्या दलितवस्ती सुधार योजनेसह २० टक्के सेस व ३ टक्के अपंग निधीच्या योजनांचा सुमारे ४० कोटींचा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत अडकल्याने लाभार्थी हवालदिल झाले आहेत. यावर्षी सप्टेंबर उलटूनही हा निधी प्रत्यक्ष खर्च, तर अप्रत्यक्ष धनादेश वटत नसल्याने खर्च होण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.
दरम्यान, या ४० कोटींच्या जिल्हा बॅँकेत अडकलेल्या निधीबाबत समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी.जी. सोनकांबळे यांना विचारणा करीत हा निधी तत्काळ लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
२० टक्के सेस मागासवर्गीय लाभार्थ्यांच्या वैयक्तिक योजनांचा निधी, आंतरजातीय विवाह योजना, शालेय शिष्यवृत्ती, अपंग शिष्यवृत्ती, वृद्ध कलावंताचे मानधन, मागासवर्गीय वसतिगृहाचा निधी, अपंगांच्या राज्यस्तरीय योजना या सर्व योजनांचा सुमारे ४० कोटींचा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत अडकला आहे. लाभार्थ्यांना दिलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे धनादेश क्लिअर होत नसल्याने लाभार्थी हवालदिल झाले आहेत. हा ४० कोटींचा निधी अडकून पडल्याने मागासवर्गीय लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देता आलेला नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. व सर्वच योजनांचे काम रखडले आहे. दलितवस्ती सुधार वस्तीचे सुमारे २८ कोटींची कामे निधीअभावी सुरू करण्यात आलेली नाही. विकासकामे ठप्प झाल्याने आणि लाभार्थ्यांना वेळेत योजनांचा लाभ देता येत नसल्याने सभापती सुनीता चारोस्कर यांनी जिल्हा बॅँकेतील अडकून पडलेला ४० कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश लेखा विभागाला दिले.

Web Title: 40 crores of social welfare schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.