१००८ भाविकांनी केली सत्यनारायणाची महापूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 04:44 PM2019-02-07T16:44:54+5:302019-02-07T16:45:07+5:30

घोडेवाडी : संत प्रभूभाई पटेल यांची उपस्थिती

1008 devotees made Satya Narayan's Mahapooja | १००८ भाविकांनी केली सत्यनारायणाची महापूजा

१००८ भाविकांनी केली सत्यनारायणाची महापूजा

Next
ठळक मुद्देढोल ताशाच्या गजरात सजवलेल्या रथातून शाही शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर दीप प्रज्वलन करून महापूजेला सुरु वात झाली

पिंपळगाव बसवंत :परिसरातील घोडेवाडी आंबे वणी येथे १००८ भाविकांनी सत्यनारायणाची महापूजा करत विश्वशांतीसह बळीराजाच्या सुखासाठी प्रार्थना केली. यावेळी संत प्रभूभाई पटेल यांची विशेष उपस्थिती लाभली.
मनुष्याच्या सुख-दु:खा मागे त्याचे कर्म कारणीभूत असते. त्यामुळे चांगल्या वाईट कर्माचा विचार करूनच प्रत्येक काम करावे, त्यातूनच उद्याचे भविष्य घडत असते, असे प्रतिपादन संत प्रभूभाई पटेल यांनी यावेळी केले.दिंडोरी येथील घोडेवाडी आंबे वणी अयोध्यानगर येथे १००८ भाविकांनी सत्यनारायणची महापूजा केली. प्रारंभी ढोल ताशाच्या गजरात सजवलेल्या रथातून शाही शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर दीप प्रज्वलन करून महापूजेला सुरु वात झाली. या पूजेत जिल्हाभरातून हजारो भाविक सहभागी झाले होते. त्यापैकी सत्यनारायण महापूजेत १००८ भाविकांनी सहभाग नोंदविला. यावेळी संत प्रभू भाई पटेल यांच्या सत्संगाचा भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्र माची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. याप्रसंगी या महापूजेसाठी अध्यक्ष देवराम पडोळ,उपअध्यक्ष पांडुरंग मोतेरे,स्वप्नील चंद्रात्रे,रामदास घोडे ,नवनाथ संधान,सुनिता संधान,नंदू क्षीरसागर, जया क्षीरसागर, बापू गायकवाड, माणिक खांदवे,संतोष तामखाने,दीपाली जाधव ,राणी संधान आदीं भाविकांनी परिश्रम घेतले. यावेळी गुजरात तसेच महाराष्ट्रातील शिव भक्त परिवार हजारोच्या संख्येने उपस्थित होता.
विश्वशांतीसाठी प्रार्थना
विश्वशांतीसाठी गरीबाच्या हातून पुण्यकर्म करून सर्वांना सुख शांती मिळावी व बळीराजाला सुखाचे दिवस येण्यासाठी या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. केदारे यांनी महापूजेच्या ध्वजावर ओम छायांकित करून आपली सेवा रु जू केली. या कार्यक्र माचे सूत्रसंचालन गोकुळ पालखेडे यांनी केले.

 

Web Title: 1008 devotees made Satya Narayan's Mahapooja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक