रिक्षाखाली दाबली गेल्याने महिला ठार : घोटाणे गावाजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:48 PM2017-12-14T17:48:29+5:302017-12-14T17:48:36+5:30

Women killed after being rickshaw puller | रिक्षाखाली दाबली गेल्याने महिला ठार : घोटाणे गावाजवळील घटना

रिक्षाखाली दाबली गेल्याने महिला ठार : घोटाणे गावाजवळील घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दोंडाईचा येथील आठवडे बाजारासाठी जाणा:या महिलेचा  तीनचाकी रिक्षाखाली दाबल्या गेल्याने मृत्यू झाला़ ही घटना गुरूवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घोटाणे गावाजवळ घडली़  
घोटाणे ता़ नंदुरबार येथील रजूबाई बन्सीलाल गोसावी ह्या दोंडाईचा येथील आठवडे बाजारात जाण्यासाठी गावातूनच जाणा:या एमएच 39-1481 या रिक्षात बसल्या होत्या़ रिक्षात गावातील चार ते पाच प्रवासी होती़ ही रिक्षा दोंडाईचाकडे जात असताना घोटाणे गावाजवळील खडक्या नाला फरशी जवळ पुढे चालणा:या ट्रकला ठोकली गेली़ यात ट्रकच्या मागील बंपरमध्ये अडकल्याने रिक्षा रस्त्याच्याकडेला उलटली़ यात रिक्षा बसलेल्या रजूबाई गोसावी ह्या दाबल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला़ नंदुरबार ते दोंडाईचा मार्गावर सध्या रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आह़े रिक्षा चालक मनोज गोसावी याने खोदकाम झालेल्या भागातून रिक्षा चालवल्याने त्याचे नियंत्रण सुटून रिक्षा ट्रकवर आदळली होती़ महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती घोटाणे गावात आल्यानंतर ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती़ यामुळे किमान तीन तास नंदुरबार-दोंडाईचा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ 
याबाबत धनराज हिमंतगीर गोसावी यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून रिक्षाचालक मनोज भिका गोसावी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

Web Title: Women killed after being rickshaw puller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.