सरपंचपाडय़ाचा पाणीपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:02 PM2019-05-26T12:02:53+5:302019-05-26T12:02:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व नर्मदा किनारी मणिबेलीचा सरपंचपाडा व जीवनशाळेच्या परिसरात पाण्यासाठी सोलरपंपाद्वारे नळपाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा ...

Water supply to the Sarpanch paddy is smooth | सरपंचपाडय़ाचा पाणीपुरवठा सुरळीत

सरपंचपाडय़ाचा पाणीपुरवठा सुरळीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व नर्मदा किनारी मणिबेलीचा सरपंचपाडा व जीवनशाळेच्या परिसरात पाण्यासाठी सोलरपंपाद्वारे नळपाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम निकृष्ट व अपूर्ण केल्याने जीवनशाळेच्या विद्याथ्र्याना व ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. ग्रामपंचायतीने या नळपाईपलाईनची दुरुस्ती केल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. सरपंचपाडा येथे पाणीपुरवठा करण्यासाठी सोलरपंपाद्वारे नळपाईपलाईन टाकण्यात आली होती. हे          काम ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण              केल्याने नळपाईपलाईन नादुरुस्त अवस्थेत पडून होती. 
जीवनशाळेचे विद्यार्थी व सरपंचपाडा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. पाण्यासाठी ग्रामस्थ व विद्याथ्र्याना खोल दरीत उतरुन नाल्यातील ङिा:याचे पाणी आणावे लागत होते. त्यामुळे सोलरपंप व पाईपलाईन दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने सोलरपंप व नळपाईपलाईनची दुरुस्ती केल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

Web Title: Water supply to the Sarpanch paddy is smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.