नर्मदा विकासच्या ‘बेपर्वाई’चे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 03:15 PM2019-01-16T15:15:24+5:302019-01-16T15:15:29+5:30

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी : जलप्रवासी वाहतुकीच्या सुरक्षेसाठी नियम ठरवावे

Victims of "indifference" of Narmada development | नर्मदा विकासच्या ‘बेपर्वाई’चे बळी

नर्मदा विकासच्या ‘बेपर्वाई’चे बळी

Next

नंदुरबार : मकरसंक्रांतीच्या शुभपर्वणीच्या नर्मदेच्या स्नानासाठी गेलेल्या नर्मदा काठावरील भाविकांवर मंगळवारी ‘संक्रांत’ आली. नर्मदेत बोट बुडाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला तर 40 पेक्षा अधिक जण बोटीत गुदमरल्याने अस्वस्थ अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. वास्तविक ही घटना म्हणजे नर्मदा विकास विभागाच्या बेपर्वाईच कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी चित्र आहे.
सरदार सरोवर प्रकल्पाची उंची 138 मीटर पूर्ण झाल्याने त्याच्या पाणलोटाने नर्मदेचे नदीतील रुपांतर सागरात झाले आहे. त्यामुळे अजूनही नर्मदा काठावर असलेल्या लोकांसाठी दळणवळणाचा प्रश्न अधिकच गंभीर आहे. मकरसंक्रांतीला नर्मदेत स्नान करण्याची परंपरा नर्मदा काठावरील आदिवासी आजही पाळत आले आहेत. त्यामुळे दरवर्षी नर्मदेच्या बुडित क्षेत्रात असलेल्या तेलखेडी, भुषा याठिकाणी शेकडो भाविक येतात. विशेषत: काठावर दुस:या नदीचे पाणी असल्याची भावना काही भाविकांमध्ये असते. त्यामुळे बहुतांश भाविक नर्मदेच्या दर्शनासाठी बोटीतून मध्य पात्रात जाऊन तेथे नारळ वाहणे व इतर पूजा करतात. असाच प्रकार मंगळवारी घडला. 
मकरसंक्रांतीची गर्दी असल्याने परिसरातील अनेक खाजगी बोटधारक व्यवसायासाठी येथे जमतात. प्रती सीट भाडय़ानुसार ते प्रवाशांना ने-आण करतात. मंगळवारी ज्या बोटीत दुर्घटना घडली ती बंदीस्त बोट होती. त्याची प्रवासी क्षमता जेमतेम 15 ते 20 जणांची आहे. मात्र बोटीत प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्यानुसार 60 पेक्षा अधिक जण होते. तर प्रशासकीय सूत्रानुसार 45 जण होते. या बोटीच्या टपावरदेखील अनेक प्रवासी होते. अर्थातच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने काठावरुन धक्का मारल्यानंतर बोट सुरू होताच काही अंतरावर गेल्यानंतर ती डगमगली. त्याचा तोल जाऊ लागल्याने टपावरील प्रवाशांनी उडय़ा घेतल्या. बोटही अर्धवट बुडाली. याठिकाणी काठावर अनेक लोक असल्याने त्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. पण ज्या बोटीत प्रवासी भरले होते ती बोट पाण्यातून काढता येत नसल्याने गावातून ट्रॅक्टर आणले व ओढून बाहेर काढले. यादरम्यान बोटीमध्ये कोंडलेल्या प्रवाशांची अवस्था काय झाली असेल त्याची कल्पना न केलेली बरी. टपावरून ज्यांनी उडय़ा मारल्या त्यात लहान मुलांची संख्याही लक्षणीय होती. त्यामुळे त्यांना पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू झाला.
खरे तर भुषा येथे मकरसंक्रांतीला स्नानासाठी गर्दी होते ही परंपरा वर्षानुवर्षापासून सुरू आहे. त्यामुळे नर्मदा विकास विभागाने याठिकाणी यापूर्वीच दक्ष राहणे अपेक्षित होते. बोटीतून होणा:या प्रवासी वाहतुकीवर सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही नियम तयार करण्यात आले नाही. कुठल्या बोटीत किती प्रवासी वाहून न्यावे याबाबतचे निकषही ठरविण्यात आलेले नाही. किंबहुना त्या भागातील बोटधारक व्यावसायिकांनाही त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वच नियमांचा भंग करीत येथे बोटीने जलवाहतूक सुरू असते. प्रशासनाने यापूर्वीच याबाबत कार्यवाही केली असती तर ही घटना टाळता आली असती किंवा त्याठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस असते तर त्यांनीही त्याबाबत काळजी घेतली असती. परंतु नर्मदाकाठ सर्वच रामभरोशावर सुरू असल्याने या भागातील आदिवासींची सुरक्षा वा:यावरच असल्याचे चित्र आहे.
 

Web Title: Victims of "indifference" of Narmada development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.