शहादा तालुक्यातील सावळदा फाटय़ाजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:43 PM2018-02-27T12:43:42+5:302018-02-27T12:43:42+5:30

Two-wheeler killer killed in road accident near Shahalda tehsil | शहादा तालुक्यातील सावळदा फाटय़ाजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

शहादा तालुक्यातील सावळदा फाटय़ाजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा तालुक्यातील सावळदा फाटय़ाजवळ समोरून येणा:या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक ठार तर एकजण जखमी झाला़ ही घटना मंगळवारी सकाळी घडली़
बामखेडा येथील भानुदास भबुता पाटील (56) व शरद भबुता पाटील हे दोघे भाऊ दुचाकीने शहादा येथून बामखेडा गावाकडे जात असताना ब:हाणपूर अंकलेश्वर राज्यमार्गावर अनरदबारी ते सावळदा फाटा या दरम्यान समोरून येणा:या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली़ यात भानुदास पाटील हे जागीच ठार झाले तर शरद पाटील हे गंभीर जखमी झाल़े मयत भानुदास पाटील यांच्या कन्येचा 30 एप्रिल रोजी विवाह असल्याने कामानिमित्त ते शहादा येथे गेले होत़े तेथून परतताना हा अपघात झाला़ जखमी शरद पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत़ अपघातामुळे बामखेडा गावावर शोककळा पसरली आह़े

Web Title: Two-wheeler killer killed in road accident near Shahalda tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.