दहा वर्षानंतर मार्गी लागला नंदुरबार रेल्वे स्थानकातील पादचारी पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:17 PM2017-11-06T12:17:11+5:302017-11-06T12:17:11+5:30

Ten years later, the pedestrian bridge of Nandurbar railway station was started | दहा वर्षानंतर मार्गी लागला नंदुरबार रेल्वे स्थानकातील पादचारी पूल

दहा वर्षानंतर मार्गी लागला नंदुरबार रेल्वे स्थानकातील पादचारी पूल

Next
ठळक मुद्देभिकारी व मद्यपींपासून सुटका व्हावी..
कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रेल्वे स्थानकातील पादचारी पूल अखेर दहा वर्षानंतर पुर्ण झाला. यामुळे कोरीटनाका, पटेलवाडी, बादशहानगर भागातील लोकांसाठी बसस्थानक परिसरात येणे सोयीचे ठरणार आहे. असे असले तरी उड्डाणपुलाकडील बाजूस आणखी एक पादचारी पुलाच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष कायम आहे. नंदुरबारातील रेल्वे स्थानकात ब्रिटीशकालीन पादचारी पूल आहे. या पुलाची एक बाजु पहिल्या व दुसरी दुस:या फलाटावर आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूस असलेल्या नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून यावे व जावे लागत होते. ही बाब लक्षात घेता आहे त्या उड्डाणपुलाचा विस्तार करून दोन्ही भाग हे रेल्वे स्थानकाच्या बाहेर काढण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती. गेल्या दहा वर्षापासूनची ही मागणी अखेर आता पुर्णत्वास आली आहे. पादचारी पुलाच्या विस्तारीकरणाचे काम पुर्ण झाले असून लवकरच तो सर्वसामान्यांना वापरण्यासाठी खुला करण्यात येणार आहे.विद्याथ्र्याना सोयीचेरेल्वे स्थानकाच्या पलिकडील वसाहतीत अर्थात पटेलवाडी, बादशहानगर, कोरीटनाका, गायत्रीनगर, महावीरनगर या भागात राहणा:या विद्यार्थी, नागरिकांना शहरात येण्यासाठी मोठी गैरसोय होत होती. उड्डाणपुलामुळे रेल्वेगेट देखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे रुळ ओलांडत विद्यार्थी व सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागत होती. स्थानकात मालगाडी उभी असल्यास त्या खालून देखील ये-जा करावी लागत होती. त्यामुळे आहे त्या पादचारी पुलाचा विस्ताराची मागणी जोर धरू लागली होती.स्थानकाच्या बाहेरून पूलपादचारी पुलाचे विस्तारीकरण करण्यात आल्यानंतर आता या पुलाची एक बाजू रेल्वे स्थानकाच्या सध्या असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पूव्रेकडील बाजूने निघणार आहे. त्यामुळे स्थानकात प्रवेश करण्याची गरज राहणार नाही. दुसरी बाजू ही बादशहा नगरात निघणार आहे. त्यामुळे रेल्वे रुळ ओलांडणे किंवा स्थानकात प्रवेश करण्याची गरज राहणार नाही हे स्पष्ट आहे.पश्चिमेकडील बाजूसही पूल हवारेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस अर्थात उड्डाणपुलाच्या बाजूला आणखी एक पादचारी पूल तयार करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. जुन्या कोरीटरोडवरील बर्फ कारखान्याजवळ एका बाजूस तर रेल्वे पोलीस ठाण्याच्या बाजूला दुसरे टोक मागणी असलेल्या नवीन पादचारी पुलाचे राहिल्यास लक्ष्मीनगर, जुन्या तहसील कार्यालयाचा परिसर, हाटदरवाजा परिसरातील नागरिकांसाठी तसेच महिला महाविद्यालय, एकलव्य, कमला नेहरू कन्या विद्यालयातील विद्याथ्र्याना ते सोयीचे ठरेल.

Web Title: Ten years later, the pedestrian bridge of Nandurbar railway station was started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.