फवारणीतून होणारी विषबाधा रोखण्यासाठी नंदुरबारात 170 प्रकारच्या औषधींचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:22 PM2018-05-23T12:22:27+5:302018-05-23T12:22:27+5:30

कृषी विभाग करणार जनजागृती : फवारणी पंप विक्रीबाबत बोंब

Supply of 170 kinds of medicines to prevent spraying of poisoning in Nandurbar | फवारणीतून होणारी विषबाधा रोखण्यासाठी नंदुरबारात 170 प्रकारच्या औषधींचा पुरवठा

फवारणीतून होणारी विषबाधा रोखण्यासाठी नंदुरबारात 170 प्रकारच्या औषधींचा पुरवठा

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 23 : गेल्या खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यात  पिकात फवारणी करताना शेतकरी आणि शेतमजूर यांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या़ हा प्रकार नंदुरबार जिल्ह्यात होऊ नये, यासाठी कृषी विभाग पुढे सरसावला असून अशा घटना घडल्यास तात्काळ उपचारासाठी 170 प्रकारच्या औषधींचा पुरवठा आरोग्य केंद्रांना करण्यात येणार आह़े 
जिल्हाधिकारी डॉ़मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली़ यावेळी कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी एऩडी़बोडके, मोहीम अधिकारी प्रशांत शेंडे यांच्यासह सर्व पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी उपस्थित होत़े बैठकीत शेतक:यांना फवारणी करताना विषबाधा झालीच तर पर्यायी औषधांचा साठा करून घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या़ आरोग्य विभागाकडे कीटकनाशकांवर पर्याय असलेल्या औषधांची यादी देण्यात आली़  
कृषी, आरोग्य, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाचा सहभाग असलेली समिती स्थापन झाली असताना दुसरीकडे शेतक:यांकडून वापरल्या जाणा:या फवारणी पंपांबाबत नियमन नसल्याचे स्पष्ट झाले आह़े फवारणी पंप विक्री कृषी विभागाच्या अखत्यारितील नसल्याचे सांगण्यात आले आह़े 
शेतक:यांसाठी विक्री करण्यात येणारे शेतीसाहित्य हे चांगल्या दर्जाचे आणि आयएसआय प्रमाणित असणे सक्तीचे आह़े परंतू जिल्ह्यातील विक्रेत्यांकडील पंपसेट व फवारणीचे नोझल हे दिल्ली आणि इंदौर येथील बनावट कंपन्यांकडून जिल्ह्यात पुरवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आह़े या पंपांमधून होणारी रसायनाची गळती शेतक:यांच्या आरोग्यासह हानीकारक ठरण्याची शक्यता आह़े हे पंप बाजारात सर्रास विक्री होऊनही कारवाई झालेली नाही़ बोगस पंपसेट व नोझल विक्री जिल्ह्यात बिनबोभाट सुरू आह़े हलक्या प्रतीचे प्लास्टिक वापरून तयार केलेल्या पाठीवरील पंपसेटला उन्हामुळे तडे जाऊन तो फुटण्याची सर्वाधिक शक्यता असत़े  
 

Web Title: Supply of 170 kinds of medicines to prevent spraying of poisoning in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.